पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुन्नी दावते इस्लामीचा शुक्रवारपासून तीन दिवसीय इज्तेमा, यंदाचे ३१ वे वर्ष

सुन्नी दावते इस्लामीचा शुक्रवारपासून तीन दिवसीय इज्तेमा, यंदाचे ३१ वे वर्ष    प्रतिनिधी  मुंबई - सुन्नी दावते इस्लामीच्या वार्षिक इज्तेमाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. तीन  दिवसीय चालणाऱ्या या इज्तेमाचा रविवारी सुर्यास्तानंतर सामूहिक प्रार्थनेने समारोप होईल. यंदाचे इज्तेमाचे ३१ वे वर्ष आहे. शुक्रवारी दुपारच्या नमाजनंतर या इज्तेमाला सुरुवात होईल. शुक्रवारी केवळ महिलांसाठी इज्तेमा असेल तर शनिवार व रविवारी केवळ पुरुषांसाठी वेळ राखीव आहे. या इज्तेमामध्ये जगभरातील इस्लामिक तज्ज्ञ वाख्यानांच्या व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करतील. संपूर्ण मानवजातीसाठी शांती व समृध्दीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येईल, इज्तेमाच्या द्वारे शांतता व जातीय सलोख्याचा संदेश दिला जाईल.  मौलाना शाकीर नुरी, सय्यद मोईनुद्दीन अश्रफ (मोईन मिया), कारी रिझवान खान, कमरुल जमा खान आझमी, कारी जहीरुद्दीन खान, मुफ्ती निजामुद्दीन रजवी, अर्शद मिस्बाही, सय्यद अमीनुल कादरी, जहीरुद्दीन मिस्बाही, जावेद अख्तर मिस्बाही, जामी रझा अजहरी, सज्जाद नजमी, सादिक रजवी हे मौलाना यामध्ये मार्गदर्शन करतील.   महिलांना शुक्

राज्यातील सत्तेत असलेले भाजप सेनेचे पदाधिकारी आंदोलनाची भाषा करतात, तर दिवा टर्निंग येथील मद्यपींना हटविणार कोण? शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांचा सवाल

राज्यातील सत्तेत असलेले भाजप सेनेचे पदाधिकारी आंदोलनाची भाषा करतात, तर दिवा टर्निंग येथील मद्यपींना हटविणार कोण?  शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांचा सवाल  लोकमानस प्रतिनिधी  मुंब्रा :- पोलीस खाते हे भाजपच्या हातात आहे आणि राज्यात शिंदे - भाजपची सत्ता आहे, मग दिव्यातील नाक्यावर दारू पिणाऱ्या मद्यपींना हटवणार कोण? असा खरमरीत सवाल  शिवसेनेचे (उबाठा) दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे.  शिवसेनेचे उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी दिवा टर्निंग येतील उघड्यावर  दारू पिणाऱ्या मद्यपींना हटवण्याची मागणी आठ दिवसापूर्वी केली होती. त्यानंतर राज्यात सत्तेत असणाऱ्या व गृहमंत्री पद असणाऱ्या भाजपने दिवा टर्निंग येथील खुल्या मैदानात बसणाऱ्या मद्यपींना हटवा, अशी मागणी पोलिसांना निवेदन देऊन केली आहे. त्याच्यावर मुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.  ज्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे, त्याच पक्षाचे लोक स्टंट करत असतील तर मग दिवा टर्निंग वरील मद्यपीना हटविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत का? असा टोला मुंडे यांनी लगावला आहे. शिंदे भाजप सरकारने एक फोन करून पोलिसांना सांगितले तरी येथील दारुडे हटव

मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांसोबतचर्चा, मुस्लिम समाजाच्या शिक्षण,आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा

इमेज
  मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत चर्चा,   मुस्लिम समाजाच्या शिक्षण,आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली मौलाना आझाद विचार मंचच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे शिक्षण,आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर निवेदन सादर करून व्यापक चर्चा केली. भारतीय संविधान देशाला समर्पित होवून ७४ वर्षे झाली.पण मुस्लिम समाजाला न्याय व समानता देताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला.     शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात मुस्लिम समाजाची दयनीय स्थिती असून  सरकारी व खाजगी नोकरीमध्ये त्याचे प्रतिनिधित्व कमी होत चालले आहे,त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.  गोपाल सिंग आयोग,सच्चर समिती,रंगनाथ मिश्रा आयोग आणि डॉ. मेहमूदुर्रहमान समितीच्या शिफारशींचा उल्लेख करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली.    १५ कलमी कार्यक्रमाची कृतिशील अंमलबजावणी,बार्टी-महाज्योतीप्रमा

मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ९ डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

  मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ९ डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन लोकमानस प्रतिनिधी मुंबई -   मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे येत्या 9 डिसेंबर रोजी शहरातील सर्व नगर व दिवाणी न्यायालय, तसेच मुख्य महानगर दंडाधिकारी, मोटार अपघात प्राधिकरण, राज्य सहकार अपिलीय न्यायालय येथे लोकन्यायालयाने आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे तडजोडपात्र फौजदारी आणि सर्व प्रकारचे दिवाणी दावे तडजोडीने संपुष्टात आणण्यात येणार आहेत.  नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी व इतर न्यायालयातील न्यायाधीश व कर्मचारी हे लोकन्यायालयाच्या अनुषंगाने नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबईचे प्रधान न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई अध्यक्ष  अनिल सुब्रम्हण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.  गेल्या वर्षभरात लोकन्यायालयाच्या माध्यमातून ३० हजारांहून अधिक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. लोकन्यायालयाचा अनेक पक्षकारांना लाभ झाला असून त्याच्यामधील दावे व वाद कायमस्वरूपी संपुष्टात आल्यामुळे उभयतांचे संबंध टिकून  राहिले आहेत. लोकन्यायालय हे वा

दिवा शहरातील बेतवडे गाव ते शिर्डी साई पदयात्रा पालखीचे प्रस्थान

इमेज
दिवा शहरातील बेतवडे गाव ते शिर्डी साई पदयात्रा पालखीचे प्रस्थान लोकमानस प्रतिनिधी  दिवा:- दिवा बेतवडे गाव येथील ओम साई सेवा मंडळ (रजि) बेतवडे आयोजित साईबाबा मंदिर येथून बेतवडे गाव ते शिर्डी साई पदयात्रा पालखीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साह आनंदात साजरा झाला.  यंदाचे मंडळाचे 12 वे वर्ष असून 150 भाविक पालखी बरोबर असून 9 ते 10 दिवस पायी चालत साई नामाचा जय घोष करत साईभक्त मोठ्या उत्साहात पदयात्रेत सहभागी झाले.  सोमवारी 4 डिसेंबर 2023 रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचतील असे मंडळाचे अध्यक्ष विजय गणपत भोईर यांनी सांगितले. या पालखीचे आयोजक सुधाकर पाटील, खजिनदार किशोर पाटील, सल्लागार मधुकर पाटील तर सचिन जयराम पाटील हे आहेत.   सदर सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.  याप्रसंगी दिवा शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर,उपशहर प्रमुख वैष्णव पाटील,  तेजस पोरजी, नवनीत पाटील,  चेतन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते

संकल्प प्रतिष्ठानतर्फे कणकवली येथे नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
संकल्प प्रतिष्ठानतर्फे कणकवली येथे नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन लोकमानस प्रतिनिधी  कणकवली -  संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  करवंटी हस्तकला प्रशिक्षण  १४ ते १६ डिसेंबर  या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कणकवली, (जि.सिंधुदुर्ग) येथे संपन्न होत आहे.  नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष मानतो. या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगात आणला जातो, मात्र करवंट्या (मोठ्या प्रमाणावर) जाळून टाकल्या जातात. समुद्र किनारी भागात नारळाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे, साहजिकच नारळाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे करवंट्या ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात.  या करवंट्या जाळण्याऐवजी त्यापासून सुंदर, आकर्षक उपयुक्त व मागणी असणा-या वस्तूंची निर्मिती करता येते व हे एक अर्थार्जनाचे साधनही ठरू शकते. गरज आहे ती याकडे डोळसपणे पाहण्याची. दुर्दैवाने मात्र आपल्या भागात याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. गेले एक तप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकता विकास या क्षेत्रात प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्य

मुंब्रा मध्ये संविधान दिवस साजरा, संविधानाच्या प्रतींचे वितरण, संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन

इमेज
मुंब्रा मध्ये संविधान दिवस साजरा, संविधानाच्या प्रतींचे वितरण, संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन  मुंब्रा : प्रतिनिधी  मुंब्रा मध्ये भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दर्गाह रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व महिलांना संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. संविधानाच्या  उद्देशिकेचे यावेळी जाहीर वाचन करण्यात आले. तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.    देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे  कामकाज संविधानानुसारच चालते. संविधानाचे  महत्त्व अनन्यसाधारण असे आहे, त्यामुळे संविधानाला वाचवणे महत्त्वाचे आहे, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. महिलांचे हक्क, अल्पसंख्याकांचे हक्क व इतर तरतुदींबाबत उपस्थितांनी यावेळी मार्गदर्शन केले.  या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या मर्झिया शानु पठाण व साकिब दाते यांच्या पुढाकाराने  करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थितांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या इच्छुकांना संविधानाच्या प्रती हव्या असतील त्यांना पठाण यांच्या कार्याल

डॉ. प्राजक्ता मोंडकर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

इमेज
डॉ. प्राजक्ता मोंडकर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी  डॉ. प्राजक्ता मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभारी शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने प्राजक्ता मोंडकर यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना बळकट करण्यासाठी मी  नेहमीच प्रयत्नशील राहीन,  अशी प्रतिक्रिया डॉ. प्राजक्ता यांनी व्यक्त केली. 

मुंब्र्यात चांद नगर परिसरात मोठा स्फोट, तीन जखमी, स्फोटाच्या कारणाबाबत साशंकता, तपास सुरु

इमेज
मुंब्र्यात चांद नगर परिसरात मोठा स्फोट,  तीन जखमी,  स्फोटाच्या कारणाबाबत साशंकता,  तपास सुरु मुंब्रा - प्रतिनिधी  मुंब्रा कौसा येथील चांद नगर परिसरात मुघल पार्क इमारतीत शनिवारी पहाटे मोठा स्फोट झाला. त्यामुळे सुमारे पाचशे मीटर परिसरात स्फोटाचे हादरे जाणवले.  या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरु करण्यात आली असून स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.   हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे इमारतीमधील सदनिकांच्या काचा फुटल्या व त्या काचा वेगाने उडाल्याने तीन व्यक्ती जखमी झाल्या.  त्यापैकी एका दहा वर्षीय मुलाच्या हाताला गंभीर जखम झाल्याने त्याला टाके घालावे लागले.   इमारतीशेजारी पार्क केलेली मारुती कार स्फोटाच्या धक्क्याने पहिल्या मजल्यापेक्षा जास्त उंचीवर उडाली व पलिकडील बाजूला जावून पडली.  पोलिस उपायुक्त गणेश गावडे, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख यासीन तडवी, माजी नगरसेवक राजन किणे यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली.  

काँग्रेस पक्ष संविधानाच्या एक लाख प्रतींचे वाटप करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते एक लाख संविधान प्रती वाटपाचा शुभारंभ होणार

काँग्रेस पक्ष संविधानाच्या एक लाख प्रतींचे वाटप करणार,   काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते एक लाख संविधान प्रती वाटपाचा शुभारंभ होणार लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ असे संविधान दिले आहे. संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले आहेत. आपल्या संविधानाची सर्वांनी माहिती झाली पाहिजे यासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यभर संविधानांच्या एक लाख प्रति वितरीत करण्याचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना हत्तीअंबीरे म्हणाले की, संविधान वाटपाच्या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे समन्वयक के. राजू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी विभागाचे चेअरमन राजेश लिलोठीया व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री आ. वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती असेल. हा

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केले पाहिजे - राज्यपाल

इमेज
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केले पाहिजे -  राज्यपाल लोकमानस प्रतिनिधी मुंबई - भारतीय नौसेनेतर्फे जी  - २० देशांमधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित आंतरशालेय प्रश्नमंजुषा 'थिंक - क्विझ' ची राष्ट्रीय पातळीवरची अंतिम फेरी राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत  गेटवे ऑफ इंडिया येथे संपन्न झाली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते डीएव्ही पब्लिक स्कुल गुरुग्रामच्या विजयी चमूला सन्मानित करण्यात आले. अंतिम फेरीतील प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी भारतीय नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार, आयोजक संस्था 'नेव्ही वेलफेयर अँड वेलनेस असोसिएशन'च्या अध्यक्षा कला हरी कुमार, मुंबईतील नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, नौदलाचे अधिकारी, त्यांचे कुटुंबीय तसेच विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. प्रश्नमंजुषा हा ज्ञानवर्धक खेळ आहे. मात्र प्रश्नमंजुषेनंतरही, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमीच प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित केले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. अर्जुनाने भगवान कृष्णांना प्रश्न विचारल्यामुळेच भगवद गीतेचे त

शिळ शालिमार ढाब्या जवळील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी

 शिळ शालिमार ढाब्या जवळील रस्त्यावर गतिरोधक बसवा,  अंजुमन एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटीची सहाय्यक आयुक्तांकडे मागणी  लोकमानस प्रतिनिधी  मुंब्रा - शिळ शालिमार ढाब्या जवळील रस्त्यावर गतिरोधक बसवा, अशी मागणी अंजुमन एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीने दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.  दिवा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या सिल्व्हर लाईन नाईस पार्क, नाईस गार्डन, नाईस सिटी, ग्रीन पार्क येथील रस्त्यांवर अतिशय वेगाने दुचाकी तसेच कार व अवजड वाहनांची रहदारी सुरु असते. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना व नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांना रस्त्यावरून चालत असताना त्रास सहन करावा लागतो. या भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंब्रा शहरातून येणाऱ्या तसेच जाणाऱ्या भरधाव वेगातील गाड्यांकरिता या ठिकाणी गतिरोधक तातडीने बसविण्यात यावेत, जेणेकरून रस्त्यावरून जाणान्या नागरिकांना दिलासा मिळेल. सदर नाईस पार्क या ठिकाणी एक शाळा तसेच एक ज्युनिअर कॉलेज तसेच मोठ-मोठाले गृहसंकुल अस्तित्वात आहेत, शाळा-कॉलेज ला जाणारे विद्यार्थी व पालक, शिक्षक वर्गाला जीव मु

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस, शिवछत्रपती पुतळा अनावरण समारंभाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस, शिवछत्रपती पुतळा अनावरण समारंभाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा सिंधुदुर्ग- राजकोट येथील भव्य पुतळ्याचे पंतप्रधानाच्या हस्ते होणार अनावरण लोकमानस प्रतिनिधी मुंबई - भारतीय नौसेनेच्यावतीने यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्य - दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आढावा घेतला.  'शिवछत्रपती भारतीय आरमाराचे जनक आहेत. तसेच त्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे, त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमांचे समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश दिले.  या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण

महापालिका उपायुक्त महेश आहेर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल

महापालिका उपायुक्त महेश आहेर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल   ठाणे - प्रतिनिधी  ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त महेश आहेर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्यांविरोधात नौपाडा पोलिस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  आहेर यांनी मुंब्र्यातील एका कार्यक्रमात मित्रांसोबत असताना शायरी बोलतानाचा व्हिडिओ एडिट करुन त्यामध्ये आक्षेपार्ह बदल  करून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती.   या प्रकरणी आहेर यांनी नौपाडा पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. आरोपी मु इम्रान हकीम व मोहम्मद रफिक मुल्ला यांच्याविरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये भा. दं. वि. कलम 500 व 501 अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  हकीम व मुल्ला यांनी आहेर यांच्या शायरीच्या व्हिडिओमध्ये छेडछाड करुन आमदार जितेंद्र आव्हाड यांचा स्वीय सहाय्यक अभिजीत पवार व साथीदारांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयासमोर मारल्याचा व्हिडिओ जोडून व  त्यामध्ये आक्षेपार्ह संवाद जोडून नवा व्हिडिओ तयार केला व व्हायरल केला. त्यामुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार

समाजवादी पक्षाच्या मुंब्रा कळवा अध्यक्षपदी अब्दुल मन्नान शेख यांची नियुक्ती

इमेज
समाजवादी पक्षाच्या मुंब्रा कळवा अध्यक्षपदी अब्दुल मन्नान शेख यांची नियुक्ती मुंब्रा - समाजवादी पक्षाच्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अब्दुल मन्नान शेख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांच्या हस्ते शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. पक्षाच्या नेतृत्वाने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरुन समाजवादी पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन व या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास आपले प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया मन्नान शेख यांनी व्यक्त केली. शेख यांच्या नियुक्तीबद्दल मुंब्रा येथील पक्षाच्या कार्यालयात त्यांचे पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले. 

अभिनेत्री मीरा जोशीच्या ऑरेंज लिलीचे पोस्टर रिलीज, जिओ सिनेमा वर लवकरच प्रदर्शित होणार

इमेज
अभिनेत्री मीरा जोशीच्या ऑरेंज लिलीचे पोस्टर रिलीज, जिओ सिनेमा वर लवकरच प्रदर्शित होणार,  मीराचा पहिला हिंदी चत्रपट मुंबई - मराठमोळी अभिनेत्री-नृत्यांगणा मीरा जोशीच्या ऑरेंज लिली या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. मीरा जोशीचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे. मीराची यामध्ये प्रमुख भूमिका आहे. टायटल रोल असलेली त्यांची पहिली फिल्म आहे. हा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट असून हा चित्रपट जिओ सिनेमावर लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रिकरणाबाबत मीरा जोशी म्हणाल्या, या चित्रपटाचे नाव असलेली ऑरेंज लिली पुले अत्यंत दुर्मिळ असल्याने चित्रिकरणासाठी खास काश्मिरमधून लिलीची फुले मागवली जात होती. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रमुख भूमिका असलेला पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मीरा अत्यंत आनंदी आहे. या चित्रपटाचे लेखक व डायरेक्टर समीर वंजारी आहेत तर प्रोड्युसर किरण राव व व्यंकटेश पवार आहेत. पुण्यातील खडकवासला येथे याचे चित्रिकरण झाले आहे. याशिवाय जिद्दी सनम या चित्रपटामध्ये देखील मीरा जोशी प्रमुख भूमिकेत काम करत असून ती यामध्ये प्रसिध्द अभिनेता शारीब हाशमी सोबत काम करत आहे. या चित्रपटाच्या  चित

महाराष्ट्रात जातीगणना करा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य सरकारकडे मागणी

इमेज
  महाराष्ट्रात जातीगणना करा,  राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्य सरकारकडे मागणी लोकमानस प्रतिनिधी  ठाणे- बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्येही जातगणना करण्यात यावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तथा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदन दिले.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर,  राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील,  ओबीसी जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील,  ठाणे ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले.  राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार, नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना पार पडली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुध्दा ओबीसी जनगणना केल्या असुन त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्यांचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करण्याबाबतची गेल्

इंडोनेशियाचे रामायण महाभारत पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार, इंडोनेशियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट

इंडोनेशियाच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपाल रमेश बैस यांची भेट ,  इंडोनेशियाचे रामायण महाभारत पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -   भारत व इंडोनेशिया यांच्यातील राजनैतिक संबंधांना पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त  इंडोनेशियाचे नाट्यरूपी रामायण व महाभारत यांचा समावेश असलेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुंबईत आयोजन केले जाणार असल्याची माहिती] इंडोनेशियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एडी वर्दोयो यांनी दिली. त्यामुळे इंडोनेशियाचे रामायण महाभारत पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. एडी वर्दोयो यांनी इंडोनेशियाच्या मुंबईतील वाणिज्यदूतावासाच्या प्रभार स्वीकारल्यानंतर राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. इंडोनेशियात रामायणाकडे सांस्कृतिक ठेवा म्हणून पाहिले जाते, असे सांगून सर्वधर्मीय कलाकार देखील रामायणाच्या सादरीकरणामध्ये भाग घेतात असे वाणिज्यदूतांनी सांगितले. भारतीय संस्कृतीचा इंडोनेशियावर मोठा प्रभाव असून मुस्लिम धर्मीय लोकांमध्ये देखील राम, विष्णू, सीता आदी नावे ठेवली जात असल्याचे त्यांनी सांगितले

दिवंगत कर्मचाऱ्याच्या पत्नीला कंपनीकडून मिळवून दिली १६ लाख रुपयांची मदत, भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश

दिवंगत कर्मचाऱ्याच्या पत्नीला कंपनीकडून  मिळवून दिली १६ लाख रुपयांची मदत,   भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्याला यश मुंबई - प्रतिनिधी  भारतीय कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे विमानतळावर काम करणाऱ्या दिवंगत कर्मचाऱ्याच्या पत्नीला दिवाळीच्या तोंडावर १६ लाख ६० हजार रुपयांची मदत मिळवून देण्यात यश आले आहे. मुंबई विमानतळावरील इंडिगो एअरलाइन्सशी संलग्न असलेल्या एजाईल एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील मृत कामगार कै. विजय लक्ष्मण वाकचौरे यांच्या पत्नीला कंपनीकडून १६ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत म्हणून मिळवून देण्यात भारतीय कामगार सेनेला यश मिळाले आहे. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून कंपनीतील कामगारांनी जमा केलेले १ लाख रुपये, असे मिळून एकूण १७ लाख ६० हजार रुपयांचा धनादेश दिवंगत कामगाराच्या पत्नीला भारतीय कामगार सेनेचे​ अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खासदार अरविंद सावंत, शिवसेना व युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई, भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या हस्ते ​भावपूर्ण वातावरणात देण्यात आले. ​त्यामुळे त्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू तरळले. भा.का.से.च्या पाठपुराव्यामुळेच ही आ

समता क्रिडा भवन आणि मुंबई उपनगर खो-खो संघटना संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेला चांगला प्रतिसाद, महिला-पुरुष अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा संपन्न

इमेज
समता क्रिडा भवन आणि मुंबई उपनगर खो-खो संघटना संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेला चांगला प्रतिसाद महिला-पुरुष अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा संपन्न मुंबई -  महिला/पुरुष अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा 2023 चे आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले होते.   समता क्रीडा भवन कांदिवली पश्चिम या ठिकाणी करण्यात आले होते. स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा माजी मंत्री, विधानपरिषदेचे आमदार  विजय (भाई) गिरकर  यांच्या हस्ते करण्यात आला.  या स्पर्धेच्या निमित्ताने माजी नगरसेविका अ‍ॅड. प्रतिभा गिरकर, माजी नगरसेविका प्रियांका मोरे, समता क्रीडा भवनाचे कार्यवाह  संजय बाविस्कर , डॉ.नरेंद्र कुंदर (सचिव मुंबई उपनगर खो-खो संघटना),  सुचित येद्रें (खजिनदार), स्पर्धा संयोजक  हेमंत  दुसार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक डॉ.नरेंद्र कुंदर, शिवछत्रपती पुरस्कार व वीर अभिमन्यू व एकलव्य पुरस्कार प्राप्त खेळाडू दिनेश मोरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू  हर्षद हातणकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू  अनिकेत पोटे व एकलव्य पुरस्

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या लढ्याला यश, जेट एअरवेज कामगारांना २० वर्षानंतर न्याय

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या लढ्याला यश,  जेट एअरवेज कामगारांना २० वर्षानंतर न्याय मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने जेट एअरवेजच्या  169 कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे.  जेट एअरवेजने फिक्स्ड टर्म कॉन्ट्रक्टच्या १६९ कामगारांना कामावरुन कमी केले होते. या अन्यायाविरुध्द भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने कायदेशीररित्या केंद्रीय सरकार औद्योगिक न्यायालयात लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयात सुध्दा दाद मागितली परंतु काहीही दिलासा मिळाला नव्हता. शेवटी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने १६९ कामगारांना संपूर्ण पगारासहीत कामावर घेण्याचे आदेश देताना केंद्रीय सरकार औद्योगिक न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश रद्द केले व कामगारांना संपूर्ण पगारासहीत कामावर घेण्याचे आदेश देताना त्यांना कायम कामगार म्हणून जेट एअरवेजला मान्यता देण्यास सांगितले. न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये या न्यायालयीन लढाईमध्ये महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर सल्लागार अॅड् जी. एस. बज, कोषाध्यक्ष एस. आर. सावंत आणि सचिव चंद्रशेखर पट्ण यांनी कामगा

उध्दव ठाकरेंना इतकी वर्षे मुंब्र्यातील शिवसैनिकांची काळजी नव्हती, स्थानिक आमदारासाठी ठाकरेंची भेट,राजन किणे यांचा आरोप

इमेज
उध्दव ठाकरेंना इतकी वर्षे मुंब्र्यातील शिवसैनिकांची काळजी नव्हती, स्थानिक आमदारासाठी ठाकरेंची भेट, राजन किणे यांचा आरोप मुंब्रा - उबाठा शिवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शनिवारी मुंब्रा भेटीवर येणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी त्याबाबत ट्वीट केले आहे. त्यावर माजी नगरसेवक, शिवसेनेचे राजन किणे यांनी उध्दव ठाकरेंना इतकी वर्षे मुंब्रा येथील शिवसैनिकांची काळजी वाटली नाही. आता केवळ स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे ते मुंब्र्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. किणे म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणीही कुठेही जाऊ शकतात. उध्दव ठाकरे कोणत्या शाखेत जाणार आम्हाला माहित नाही. इथे त्यांची कोणतीही शाखा नाही. कदाचित त्यांची शाखा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात असेल तिथे ते भेट द्यायला येत असतील, ही शाखा आम्ही बनवली आहे, आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून ही शाखा तयार करण्यात आली होती. उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत यांना शिवसेनेची काही काळजी नाही. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत हातमिळवणी करुन शिवसेना  (उबाठा गट)  व राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना रसातळाला नेले असल्याची टीका

प्रताप होगाडे यांच्यासहित जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश

इमेज
प्रताप होगाडे यांच्यासहित जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश  मुंबई - जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रताप होगाडे यांच्यासहित पदाधिकाऱ्यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार रईस शेख, परवेज सिद्दीकी, अब्दुल रऊफ, राहुल गायकवाड उपस्थित होते.  आझमी म्हणाले, आमचा पक्ष धर्मनिरपेक्षतेला महत्त्व देत आला आहे त्यामुळे विचारधारेच्या मुद्द्यावर जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. समाजवादी पक्ष नेहमीच हा लढत राहील, असा विश्वास आझमी यांनी व्यक्त केला. रेवण भोसले, डॉ. पी.डी. जोशी, साजदा निहाल अहमद, शिवाजीराव पारुलकर, नादेश आंबेडकर, कुमार राऊत यांच्यासहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी समाजवादी पक्षात प्रवेश केला.    आमदार शेख म्हणाले, भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, सोलापूर आदी शहरातील यंत्रमाग उद्योग अत्यंत अडचणीत आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.  वस्त्रोद्योगाबाबत व्यापक धोरण आखण्यात सरकारला अपयश आल्याची टीका त

मुंब्रा येथील शिवसेना शाखेचे भूमीपूजन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार

इमेज
मुंब्रा येथील शिवसेना शाखेचे भूमीपूजन, नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार मुंब्रा -   मुंब्रा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचे भूमीपूजन आज मोठ्या उत्साहात करण्यात आले. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजन किणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे भूमीपूजन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील शाखेचा ताबा शिवसैनिकांनी उबाठा गटाकडून घेतला होता, त्यानंतर ती शाखा नुतनीकरणासाठी जमीनदोस्त करण्यात आली होती. यावेळी गोपाळ लांडगे म्हणाले, या शाखेची स्थापना स्व.आनंद दिघे यांनी स्थापन केली होती. मात्र ती शाखा मोडकळीला आल्याने ती नुतनीकरणासाठी तोडण्यात आली. आज शाखेचे भूमीपूजन करण्यात आले असून दोन महिन्यात याचे काम पूर्ण केले जाईल व नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०२४ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न राहील.  राजन किणे म्हणाले, ही शाखा अत्यंत चांगली बनवण्यात येईल व या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांच्या समस्या स

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे महापालिकेची मुंब्य्रात क्षयरोग (टीबी) मुक्त मिठाई दुकान मोहीम, डिजिटल क्ष-किरण मशिनद्वारे शहरात टीबी तपासणी शिबिरांचे आयोजन

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे महापालिकेची मुंब्य्रात क्षयरोग (टीबी) मुक्त मिठाई दुकान मोहीम, डिजिटल क्ष-किरण मशिनद्वारे शहरात टीबी तपासणी शिबिरांचे आयोजन मुंब्रा  : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे महापालिकेने मुंब्य्रात क्षयरोग (टीबी) मुक्त मिठाई दुकान मोहीम सुरू केल्याची माहिती ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.  क्षयरोगापासून ग्राहकांचे रक्षण व्हावे या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत असून,  मुंब्रा शहरात क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नागरिकांची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगितले.  क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून इतरांनाही संसर्ग होऊ शकतो. क्षयरोगाचे योग्य वेळी निदान झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.  यासाठी मुंब्रा शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात क्षयरोग शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये महापालिकेने पथके तयार केली आहेत, ही पथके दुकाने आणि शिबिरांमध्ये जाऊन चाचण्या घेतील, तसेच घटनास्थळी क्ष-किरण तपासणी करतील. डिजीटल एक्स-रे मशिनद्वारे लोकांची तपासणी केली

पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मुंब्र्यात महिला करणार सामूहिक प्रार्थना, मर्झिया पठाणकडून आयोजन

पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मुंब्र्यात महिला करणार सामूहिक प्रार्थना,  मर्झिया पठाणकडून आयोजन  मुंब्रा - पॅलेस्टाईनवर होत असलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व मृत्यू पावलेल्या नागरिकांसाठी मुंब्रा मध्ये महिला सामूहिक प्रार्थना करणार आहेत. मर्झिया शानु पठाण यांनी याचे आयोजन केले आहे. पॅलेस्टाईनमधील हल्ल्याला एक महिना उलटून गेला आहे.  ९ नोव्हेंबर ला दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अमृतनगर येथील दादी कॉलनी मधील पिंट्या ग्राऊंड मध्ये ही प्रार्थना केली जाईल. या सामूहिक प्रार्थनेमध्ये मुंब्रा कौसा मधील महिला, तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मर्झिया पठाण यांनी केले आहे. गाझा व पॅलेस्टाईन मध्ये सुरु असलेल्या कारवाई विरोधात केंद्र सरकारने आवाज उठवावा, केंद्र सरकारने देखील पॅलेस्टाईनला पाठिंबा  द्यावा, अशी मागणी पठाण यांनी केली. आता पर्यंतच्या केंद्र सरकारांनी नेहमीच इस्त्राईलला विरोध केला आहे व पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

खैरख्वाही फाऊंडेशनच्या डायग्नोस्टिक सेंटरचे मोईन मियांच्या हस्ते उद्घाटन

खैरख्वाही फाऊंडेशनच्या डायग्नोस्टिक सेंटरचे मोईन मियांच्या हस्ते उद्घाटन  मुंब्रा -  खैरख्वाही फाऊंडेशनच्या डायग्नोस्टिक सेंटरचे नुकतेच ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाचे अध्यक्ष मौलाना मोईनुद्दीन अश्रफ (मोईन मिया) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रझा अकादमीचे अध्यक्ष मौलाना सईद नुरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मौलाना मोईन मिया यांनी संस्थेमार्फत सुरु असलेल्या विविध समाजोपयोगी कामांबद्दल संस्थेचे कौतुक केले.  २०१८ मध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. गरजू नागरिकांना विनामूल्य रेशन वाटप, मौलानांना आवश्यक सुविधा पुरवणे, चॅरिटेबल क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा व औषधे पुरवणे, शैक्षणिक मदत करणे, अशा विविध माध्यमातून सेवा करणाऱ्या या संस्थेकडून आता डायग्नोस्टिक सेंटरची सेवा दिली जात आहे.  ज्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क आकारले जाते त्या चाचण्या या ठिकाणी अवघ्या २५० रुपयांत केल्या जातील, सर्वसामान्य  पहिल्या टप्प्यात याद्वारे विविध पॅथॉलॉजी चाचण्या केल्या जातील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एक्सरे व तिसऱ्या टप्प्यात सोनोग्राफी व

स्वच्छ मुंब्रा सुंदर मुंब्रा साठी मर्झिया पठाणचा पुढाकार, 100 कचऱ्याच्या डब्यांचे वाटप

इमेज
स्वच्छ मुंब्रा सुंदर मुंब्रा साठी मर्झिया पठाणचा पुढाकार,   100 कचऱ्याच्या डब्यांचे  वाटप  मुंब्रा : मुंब्रा कौसा शहराला स्वच्छ करण्यासाठी व नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व बिंबवण्यासाठी शंभर कचऱ्यांच्या डब्यांचे वितरण करण्यात आले. मर्झिया शानु पठाणने यासाठी पुढाकार घेतला आहे.   रविवारी यासाठी विविध सोसायट्यांना कचऱ्याच्या डब्यांचे वितरण करण्यात आले. याबाबत मर्झिया पठाण म्हणाल्या,  आपले शहर,  आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही केवळ महापालिकेची,  प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांची देखील जबाबदारी आहे.  त्यामुळे आपला परिसर,  सोसायटी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.  स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मॅक्स मार्शल आर्ट स्पर्धेला चांगला प्रतिसाद, २०० स्पर्धकांनी घेतला सहभाग

मॅक्स मार्शल आर्ट स्पर्धेला चांगला प्रतिसाद, २०० स्पर्धकांनी घेतला सहभाग मुंब्रा- मुंब्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मॅक्स मार्शल आर्ट स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला व आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले. प्रशिक्षक याकूब खान यांच्या मार्गदर्शनाखाली आझमी फाऊंडेशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांपासून मोठ्या तरुणांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. यामध्ये प्रथम क्रमांक सय्यद अफसर, द्वितीय क्रमांक आलम इद्रिसी, तृतीय क्रमांक सलीम खान, चतुर्थ क्रमांक रिझवान खान, पाचवा क्रमांक अल सामी, सहावा क्रमांक हुदा सय्यद व सातवा क्रमांक अरविंद यांना देऊन गौरवण्यात आले. या प्रशिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पदके मिळवली. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांना गौरवण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर खान, अझीम शेख, ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य शमीम खान उपस्थित होते. शब्बीर खान म्हणाले, मुलांना व्यसनांपासून व वाईट सवयींपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना शिक्षणासोबत विविध खेळांसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुंब्रा कौसा म

ज्योती पाटील यांना भाजप महिला मंडल अध्यक्ष पदावरून हटवले, महिलांमध्ये नाराजी

इमेज
 ज्योती पाटील यांना भाजप महिला मंडल अध्यक्ष पदावरून हटवले, महिलांमध्ये नाराजी लोकमानस प्रतिनिधी  दिवा:-दिव्यातील तीव्र पाणीटंचाईवर आक्रमकपणे भूमिका घेत महापालिका मुख्यालयावर पाणी हक्क आंदोकानाद्वारे धडक देणाऱ्या व दिव्यातील महिलांचे प्रश्न सातत्याने मांडणाऱ्या ज्योती पाटील यांना भाजपने महिला मंडळ अध्यक्ष पदावरून हटवल्याने महिला वर्गात नाराजी आहे. ज्योती पाटील या पक्षाचे काम विविध उपक्रम राबवून करत असताना नव्या मंडळ कार्यकारणी मध्ये त्यांना महिला मोर्चा अध्यक्ष पदावरून  डावल्याने दिव्यातील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण तयार करून विविध प्रश्न हातात घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजप मध्ये जाणूनबुजून खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा आता दिव्यात रंगली आहे. दिवा भाजपचे दोन मंडळ अध्यक्ष पक्ष सोडून शिवसेनेत गेल्यानंतर ज्योती पाटील यांनी पाचशे महिलांसोबत भाजप मध्ये प्रवेश केला होता.पक्ष अडचणीत असताना पक्षाला उभारी देण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कार्यकाळ पण दिला जात नसेल तर उपयोग काय?असा सवाल

मुख्यमंत्र्यांचे सरकारी ‘वर्षा’ निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का:? अतुल लोंढे यांनी उपस्थित केला प्रश्न

मुख्यमंत्र्यांचे सरकारी ‘वर्षा’ निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का: ?  अतुल लोंढे यांनी उपस्थित केला प्रश्न,  रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादवला ‘वर्षा’वरील गणपती आरतीचा मान मुंबई - मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणे मुश्कील असते. वर्षा वर प्रवेश देताना विविध पातळ्यांवर सुरक्षेची तपासणी केली जाते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात वर्षावर गुंडांना सहज प्रवेश मिळत असल्याचे दिसते.   सापांच्या विषाच्या रेव्ह पार्ट्या आयोजित करणा-या एल्वीस यादव सारख्या टुकार युट्युबरला विशेष आमंत्रण देऊन ‘वर्षा’वरील गणपती आरतीला बोलावल्याचे उघड झाले आहे ,  असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.   यासंदर्भात अतुल लोंढे पुढे म्हणाले की ,  विषारी रेव्ह पार्टी आयोजित केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी एल्वीस यादव व त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला असून त्यांच्याकडे जिवंत विषारी साप सापडले आहेत. नोएडाच्या पोलिसांना एल्वीस यादव रेव्ह पार्ट्या आयोजित करतो याचा छडा लागला पण मुंबई अथ

मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा शिवसैनिकांनी घेतली ताब्यात, उबाठा गटाला धक्का

मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा शिवसैनिकांनी घेतली ताब्यात,  उबाठा गटाला धक्का  मुंब्रा - शिवसेना (उबाठा)  गटाच्या ताब्यात असलेल्या मुंब्रा येथील शाखेचा ताबा गुरुवारी शिवसैनिकांनी घेत शाखा हस्तगत केली.  ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक राजन किणे, शिवसेनेचे कल्याण ग्रामिणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यावेळी उपस्थित होते. विभाग प्रमुख महेश किणे,  शहर अध्यक्ष मुबीन सुर्वे, आझाद चौघुले एफ एम इलियास, महिला आघाडीच्या लता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी ही शाखा ताब्यात घेतली.  याप्रकरणी राजन किणे म्हणाले, शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  खासदार डॉ  श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार आम्ही या शाखेचा ताबा घेतला आहे.  ही बंद पडलेली शाखा आम्ही लवकरच पुन्हा कार्यरत करुन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहू.   गेल्या काही काळापासून ही शाखा बंद होती,  त्यामुळे नागरी हिताची कामे बंद होती आता या कामांना चालना मिळेल,  असा विश्वास किणे यांनी व्यक्त केला.  न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत असल्याचा निर्णय

मनोज जरांगेंचे आंदोलन मागे, सरकारला दिली 2 जानेवारी पर्यंतची मुदत

मनोज जरांगेंचे आंदोलन मागे,  सरकारला दिली 2 जानेवारी पर्यंतची मुदत मुंबई - मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी 9 दिवस चाललेले आपले उपोषण मागे घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची कार्यवाही करण्यासाठी त्यांनी सरकारला 2 जानेवारी पर्यंतचा वेळ दिला आहे.   सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी गावात जावून जरांगे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत सरकारला  वेळ दिला आहे.  वेळ घ्या पण आरक्षण द्या, असे ते म्हणाले.  मराठा आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीने जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती दिली.  जरांगेच्या भेटीला गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळात उदय सामंत, धनंजय मुंडे, अतुल सावे,  संदीपान भुमरे व माजी मंत्री बच्चू कडू यांचा समावेश होता. 

कोकण रेल्वेच्या सीेएमडी पदी संतोष कुमार झा यांची निवड

इमेज
कोकण रेल्वेच्या सीेएमडी पदी संतोष कुमार झा यांची निवड लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - कोकण रेल्वेच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संंचालकपदी (सीएमडी) संतोष कुमार झा यांची निवड करण्यात आली आहे.  पब्लिक एंटरप्राईज सिलेक्शन बोर्डाने या पदासाठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये पाच उमेदवारांचा समावेश होता. त्यामधून संतोष कुमार झा यांची निवड करण्यात आली. ते 1992 च्या बँचचे इंडियन रेल्वे ट्रँफिक सर्व्हिस (आयआरटीएस) अधिकारी आहेत.  झा हे सध्या कोकण रेल्वेच्या संचालक ( ऑपरेशन व कमर्शियल) पदावर कार्यरत आहेत. झा यांना कवितेची आवड असून ते प्रथितयश कवी आहेत. अनेक कवी संमेलन-मुशायरा मध्ये ते सहभागी झाले आहेत.  झा यांच्या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव, राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

 मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव,  राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई :- मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नये, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.             बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, वि