खैरख्वाही फाऊंडेशनच्या डायग्नोस्टिक सेंटरचे मोईन मियांच्या हस्ते उद्घाटन

खैरख्वाही फाऊंडेशनच्या डायग्नोस्टिक सेंटरचे मोईन मियांच्या हस्ते उद्घाटन 

मुंब्रा - 

खैरख्वाही फाऊंडेशनच्या डायग्नोस्टिक सेंटरचे नुकतेच ऑल इंडिया सुन्नी जमैतुल उलेमाचे अध्यक्ष मौलाना मोईनुद्दीन अश्रफ (मोईन मिया) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी रझा अकादमीचे अध्यक्ष मौलाना सईद नुरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मौलाना मोईन मिया यांनी संस्थेमार्फत सुरु असलेल्या विविध समाजोपयोगी कामांबद्दल संस्थेचे कौतुक केले. 

२०१८ मध्ये नागरिकांना मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. गरजू नागरिकांना विनामूल्य रेशन वाटप, मौलानांना आवश्यक सुविधा पुरवणे, चॅरिटेबल क्लिनिकच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा व औषधे पुरवणे, शैक्षणिक मदत करणे, अशा विविध माध्यमातून सेवा करणाऱ्या या संस्थेकडून आता डायग्नोस्टिक सेंटरची सेवा दिली जात आहे. 

ज्या वैद्यकीय चाचण्यांसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क आकारले जाते त्या चाचण्या या ठिकाणी अवघ्या २५० रुपयांत केल्या जातील, सर्वसामान्य 

पहिल्या टप्प्यात याद्वारे विविध पॅथॉलॉजी चाचण्या केल्या जातील, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात एक्सरे व तिसऱ्या टप्प्यात सोनोग्राफी व त्यानंतर रुग्णालय उभारण्याचा संस्थेचा मानस आहे. 

या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने मौलाना उपस्थित होते. ज्या व्यक्तींना संस्थेला काही मदत करायची असेल तर त्यांनी संस्थेशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही