मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण,  
गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार,  शरद कुळकर्णींची ग्वाही 

खलील गिरकर - मोंड 

मोंड येथील शांताराम विष्णू कुळकर्णी माध्यमिक शाळेच्या प्रांगणात मोंड ग्रामस्थ विकास मंडळ मुंबईतर्फे बांधण्यात आलेल्या कै.  श्रीमती शिल्पा मोहन गोरे रंगमंच  व शाळा परिसराच्या नुतनीकरणाचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 
 मोंड पंचक्रोशीतील आबालवृध्दांनी या मंगलसोहळ्याला मोठी गर्दी केली होती. मंडळाचे अध्यक्ष शरद कुळकर्णी व मुंबईच्या कार्यकारिणी सदस्यांनी यासाठी खास उपस्थिती लावली. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद कुळकर्णी होते.  यावेळी बापू मुणगेकर, मंगेश माणगावकर,शामसुंदर मुणगेकर, प्रकाश अनभवणे, गोविंद  झरकर, शरद घाडी, संजय देवरुखरकर, लवू मोंडे,  गणेश राणे, आसावरी कदम, प्रदीप कोयंडे, अभय बापट, प्रसाद कुळकर्णी, शामल अनभवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  उपाध्यक्ष सुभाष अनभवणे यांनी केले.  
अभय बापट यांनी आभार प्रदर्शन केले. 
उप सचिव शरद घाडी यांनी गावच्या विकासाबाबत आपली मते मांडली व कुळकर्णी यांच्या अनुभवाचा लाभ संस्थेला नेहमी मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

 
सचिव प्रकाश अनभवणे म्हणाले की इतकी सुंदर शाळा आपणास खेडेगावात नव्हे तर सिंधुदुर्गातही सापडणार नाही. हे केवळ देणगीदारांमुळेच शक्य झाले. सर्व ग्रुप मध्ये शाळेची प्रसिध्दी करून शाळा महाराष्ट्रात पोहचवा असे आवाहन केले.

शरद कुळकर्णी यांनी मोंड ग्रामस्थ विकास मंडळाच्या स्थापनेपासूनच्या आजपर्यंतच्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली व आगामी प्रकल्पांबाबत सुतोवाच केले.  शाळेला आणखी उंचीवर नेण्याचा निर्धार कुळकर्णी यांंनी व्यक्त केला व शेवटच्या क्षणापर्यंत संस्थेच्या, शाळेच्या, गावाच्या विकासासाठी कटीबध्द राहण्याचा निर्धार व्यक्त केला. मोंड येथे मोठे, सुसज्ज, अत्याधुनिक सुविधांनी युक्त ग्रामसचिवालय बांधण्यात येणार असून लवकरच त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध होईल,  अशी माहिती त्यांनी दिली. त्यासाठी पाठपुरावा करण्याचा शब्द त्यांनी गावकऱ्यांना दिला. 

कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत डॉ.  शरीफ गिरकर व डॉ  सचिन पोकळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.  
या संपूर्ण कार्यक्रमासाठी झटणाऱ्या माजी सरपंच प्रदीप कोयंडे यांना देखील गौरवण्यात आले. 
नाद भोळेवाडी येथील रसिका पाष्टे यांच्या महिलांच्या चमूने समई नृत्य सादर करुन कार्यक्रमाला अधिक रंगत आणली. समई नृत्याला उपस्थितांचा मोठा प्रतिसाद मिळाला. 
मोहन गोरे यांनी त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावे संस्थेला दिलेल्या 11 लाख रुपये देणगीतून या रंगमंचाचे काम करण्यात आले. या रंगमंचाच्या माध्यमातून उदयोन्मुख विद्यार्थी कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खास मुंबईहून कार्यकारिणी सदस्य अँड गणपत मोंडे, सचिन पुजारे, 
महादेव झरकर, श्रीपत झरकर, विजय झरकर, विलास मोंडकर, विनायक मुणगेकर व अँड खलील गिरकर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन