सय्यद अली दुजाना गुरदेजी यांचा ‘चॅम्पियन जस्टिस अँड पीस अवॉर्ड’ने गौरव
लोकमानस प्रतिनिधी - मुंबई : ‘बिलियनेअर्स फॉर पीस कॉन्क्लेव्ह 2026’मध्ये अजमेर शरीफ दर्ग्याचे केअरटेकर सय्यद अली दुजाना गुरदेजी यांना ‘आय अॅम पीसकीपर – चॅम्पियन जस्टिस अँड पीस अवॉर्ड’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शांतता, मानवता, आध्यात्मिक एकात्मता आणि सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगभरातील नेते, राजनैतिक प्रतिनिधी, समाजसेवक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला. अजमेर शरीफ दर्ग्याची परंपरा आणि ख्वाजा गरीब नवाज (र.अ) यांच्या शिकवणीचे प्रतिनिधित्व करताना सय्यद अली दुजाना गुरदेजी यांनी करुणा, सर्वधर्म समभाव आणि मानवसेवेचा संदेश दिला. सूफी विचारसरणी प्रेम, शांतता, सहअस्तित्व आणि बंधुभाव शिकवते, असे त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान त्यांनी अभिनेते व समाजसेवक सोनू सूद, ज्येष्ठ अभिनेते बोमन इराणी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा,अभिनेते जावेद जाफरी, ज्येष्ठ अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या शबान...