मुंब्रा-कौसामध्ये सुमारे आठ तास वीजपुरवठा खंडित- टोरंट पॉवरविरोधात नागरिकांचा संताप
मुंब्रा : ठाणे महापालिका हद्दीतील मुंब्रा-कौसा परिसरात रविवारी संध्याकाळी सुमारे साडेसात वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी पहाटे सुमारे सव्वा तीन वाजता पूर्ववत झाला. जवळपास आठ तास वीजपुरवठा बंद राहिल्याने हजारो नागरिकांना प्रचंड मनस्ताप आणि गैरसोयींना सामोरे जावे लागले. या दीर्घकाळाच्या वीजखंडितीमुळे टोरंट पॉवरच्या कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, कंपनीच्या जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रविवारी रात्रीच्या वेळेत अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक कुटुंबांना फॅन, एसी बंद पडल्याने उकाड्याचा सामना करावा लागला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण तसेच महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पाणी टाकीत भरण्यासाठी वीज नसल्याने पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाला. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली, तर इन्व्हर्टर आणि बॅटरीची क्षमता संपल्याने नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. मोबाईल फोन चार्ज करता न आल्याने संपर्क व्यवस्था विस्कळीत झाली. वीजबिल भरण्यास काही दिवसांचा विलंब झाला तरी टोरंट पॉवरकडून विलंब शुल्क आकारले जाते. थकबाकी वाढल्यास ...