पोस्ट्स

एप्रिल, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मातृछाया - एक अमूल्य बंध

इमेज
मातृछाया - एक अमूल्य बंध - सौ. ऋतुजा तिर्लोटकर ---------- मातृछाया - अर्थात मायेची सावली -  एक उबदार घरटे - जिथे एखाद्या  मायाळू आई प्रमाणे आमच्या लाडक्या लेकरांची काळजी घेतली जाते. त्यांना आपल्या नातवंडांप्रमाणे भरभरून प्रेम केले जाते. आपण बोलत आहोत,  ज्योती ताई जाधव यांच्या, विलेपार्ले येथील प्रख्यात मातृछाया पाळणा घराबद्दल !! ज्योती ताई या तेथील कुटुंब प्रमुख तथा सर्वेसर्वा आहेत. मातृछायाची खासियत अशी आहे की लोकांसाठी जरी हे पाळणाघर असले तरी तिथे येणार्‍या प्रत्येक चिमुकल्यांसाठी एक हक्काचे घर आहे, जिथे ते मनसोक्त खेळतात,  बागडतात, मस्ती करतात अणि त्यांच्या कुटुंबाचे जणू एक सदस्यच बनून जातात !! ज्योती ताईच्या या उदात्त कार्याला नुकतीच 15 वर्षे पूर्ण झाली. या पंधरा वर्षांत त्यांनी 300 हून अधिक मुलांना सांभाळले, त्यांना फुलासारखे जपले. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.  मातृछाया हा त्यांच्यासाठी फ़क्त एक व्यवसाय नाही आहे तर ही एक पुजा आहे. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो. तसेच लहान मुले म्हणजे देवाघरची फुले. अणि या फ...

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी यांना ‘व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार’

इमेज
नफिसा गिरकर  ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आरडीएमसी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी यांना “व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नुकताच  पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेत्री शुभांगी गोखले, अभिनेत्रीस्वाती चिटणीस, बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वा़ड, विजय शेट्टी,डॉ.अजय ठक्कर तसेच डॉ.बोमन धाभर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत यासिन तडवी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे ठाणे शहराच्या आपत्कालीन सेवांना अधिक बळकटी मिळाल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.

बांग्लादेशी एबी बँकेकडून कर्करोग उपचार व संशोधनासाठी ४० लाखांची मदत

इमेज
— भारत-बांग्लादेश आरोग्य सहकार्याला चालना नफिसा गिरकर -  मुंबई : बांग्लादेशच्या मुंबईतील उप-उच्चायुक्त फरहाना चौधरी यांच्या उपस्थितीत एबी बँक पीएलसी, मुंबई शाखेकडून कर्करोग उपचार व संशोधनासाठी ४० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. हा निधी टाटा मेमोरियल सेंटरअंतर्गत नवी मुंबईतील ‘अॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर’ (ACTREC) यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत प्रदान करण्यात आला. एबी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दरायूस बजान व वरिष्ठ उपाध्यक्ष मोहम्मद अबुल कलाम आझाद यांनी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. या निधीतून अत्याधुनिक संशोधन उपकरणांची खरेदी, कर्करोगावरील आण्विक व ट्रान्सलेशनल संशोधनाला चालना, तसेच निदान व उपचारांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. यावेळी डॉ. सुदीप गुप्ता यांनी टाटा मेमोरियल सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार सुविधांची माहिती दिली. नवी मुंबईतील ACTREC केंद्रात प्रोटॉन थेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, तुलनेन...

समाजवादीच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी शब्बीर खान यांची नियुक्ती

इमेज
नफिसा गिरकर : लोकमानस - मुंब्रा : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी शब्बीर अहमद सिराजुद्दीन खान यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या हस्ते शब्बीर खान यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते फरहान आझमी देखील उपस्थित होते. या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास समाजवादी पक्षाने व्यक्त केला आहे. शब्बीर खान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची कामगिरी अधिक प्रभावी होऊन सर्वसामान्य जनतेची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, असेही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. पक्ष कार्यकर्त्यांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून आगामी काळात संघटनात्मक बळकटीसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक स्तरावर पक्षाची पकड वाढवून जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले. दरम्यान, पक्षाने आपल्या वर दाखवलेल्या विश्वासाला पूर्ण न्याय देत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा निर्धार शब्बीर खान यांनी व्यक्त क...

भारत हा केवळ शेजारी देश नसून विश्वासू मित्र- फरहाना चौधरी- बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन व राष्ट्रीय दिन उत्साहात साजरा

इमेज
नफिसा गिरकर : (मुंबई) - भारत हा बांगलादेशाचा केवळ शेजारी देश नसून विश्वासू मित्र आहे. दोन्ही देशांमध्ये सुमारे ४००० किमी सीमा असून दोन्ही देशातील परस्पर संबंध तळागाळापर्यंत पोहोचले आहेत, असे बांगलादेशच्या मुंबईतील उप-उच्चायुक्त फरहाना चौधरी म्हणाल्या. बांगलादेशचा स्वातंत्र्याचा ५५ वा वर्धापनदिन नुकताच मुंबईत पंचतारांकित हॉटेलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. राज्य सरकारचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  फरहाना चौधरी म्हणाल्या, हा दिवस केवळ राष्ट्रनिर्मितीचा नसून स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या शहीदांचे स्मरण करण्याचा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भारतीय सैनिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. २०२४-२५ या कालावधीत दोन्ही देशांतील व्यापार सुमारे १२ बिलियन यूएस डॉलर्सपर्यंत पोहोचल्याची माहिती देत, द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नवनिर्वाचित नेतृत्व आणि विश्वासू भागीदारीचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे वि...