समाजवादीच्या मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी शब्बीर खान यांची नियुक्ती



नफिसा गिरकर :
लोकमानस - मुंब्रा : समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी शब्बीर अहमद सिराजुद्दीन खान यांची मुंब्रा-कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या हस्ते शब्बीर खान यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते फरहान आझमी देखील उपस्थित होते.

या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास समाजवादी पक्षाने व्यक्त केला आहे. शब्बीर खान यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची कामगिरी अधिक प्रभावी होऊन सर्वसामान्य जनतेची सेवा अधिक चांगल्या प्रकारे करता येईल, असेही पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
पक्ष कार्यकर्त्यांनी या नियुक्तीचे स्वागत केले असून आगामी काळात संघटनात्मक बळकटीसाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक स्तरावर पक्षाची पकड वाढवून जनतेच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही कार्यकर्त्यांनी नमूद केले.

दरम्यान, पक्षाने आपल्या वर दाखवलेल्या विश्वासाला पूर्ण न्याय देत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहणार असल्याचा निर्धार शब्बीर खान यांनी व्यक्त केला. तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत व सशक्त करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करत, आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवणार असल्याचेही स्पष्ट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब