आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी यांना ‘व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार’
नफिसा गिरकर
ठाणे : रोटरी क्लब ऑफ ठाणे हिल्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आरडीएमसी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख यासिन तडवी यांना “व्यावसायिक उत्कृष्टता पुरस्कार २०२६” देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाला अभिनेत्री शुभांगी गोखले, अभिनेत्रीस्वाती चिटणीस, बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वा़ड, विजय शेट्टी,डॉ.अजय ठक्कर तसेच डॉ.बोमन धाभर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत यासिन तडवी यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे ठाणे शहराच्या आपत्कालीन सेवांना अधिक बळकटी मिळाल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा