मुंब्रा कौसा येथील भाजपच्या इफ्तार कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद
नफिसा गिरकर (कौसा ) : पवित्र रमजान महिन्यानिमित्त भाजप ठाणे जिल्हा अल्पसंख्याक मोर्चा आणि कौसा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार पार्टीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला विविध राजकीय पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाला भाजपचे ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले,
ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह विक्रम भोईर, सुमीत भोईर,संजय वाघुले, मृणाल पेंडसे, योगेश भोईर, कुणाल पाटील, सचिन केदारी, वीर सिंग प्राचा यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वृषाली वाघुळे, नताशा सोनकर, रुक्सना शेख, सलीमा पटेल आदींनीही उपस्थिती लावली.
या इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन ठाणे जिल्हा अल्पसंख्यक मोर्चाचे अध्यक्ष शरीफ शेख आणि कौसा मंडळाच्या अध्यक्षा नाझिया हारून तांबोळी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी रमजान महिन्याच्या शुभेच्छा देत समाजात एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा संदेश दिला.
सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आयोजकांनी आभार मानले. रमजानच्या पवित्र महिन्यात अशा कार्यक्रमांमुळे समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्य आणि सद्भावना वाढण्यास मदत होते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा