मुसन्ना मिया यांचा वार्षिक ऊर्स संपन्न, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती
मुंबई - हजरत मुसन्ना मिया यांचा वार्षिक ऊर्स गुरुवारी मध्यरात्री भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या ऊर्ससाठी मुंबई, ठाणे तसेच परिसरातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
ऊर्स निमित्त मुसन्ना मिया यांचे उत्तराधिकारी तसेच ऑल इंडिया जमैतुल उलेमा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद
मोईनुद्दीन अश्रफ (मोईन मिया) यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रमाचे आयोजन छोटा सोनापूर येथे करण्यात आले होते. यावेळी मोईन मिया यांनी सामूहिक दुआ केली. समाजात शांतता, सलोखा आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना उबाठाचे खासदार अरविंद सावंत, खासदार संजय दिना पाटील, आमदार मनोज जामसूतकर, माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री कॉंग्रेसचे आमदार अस्लम शेख, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख,माजी मंत्री आरिफ नसीम खान, माजी आमदार जीशान सिद्दीकी, माजी राज्य मंत्री शिवसेना उबाठाचे आमदार सचिन अहिर, काँग्रेस विधिमंडळ उपनेते आमदार अमिन पटेल, अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे नेते हाजी अरफात शेख, एमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ता माजी आमदार वारीस पठाण, एमआयएम मुंबईचे माजी अध्यक्ष फारूक शाब्दी, भाजपा अल्पसंख्याक विभागाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष वसीम खान, इस्लाम जिमखानाचे अध्यक्ष माजी आमदार युसुफ अब्राहनी, ठाणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानू पठाण, एमआयएमचे गटनेते सैफ पठाण, मुंबई महापालिकेचे नगरसेवक वकार खान, माजी नगरसेवक जावेद जुनेजा, तसेच माहीम दर्गाहचे प्रमुख सोहेल खंडवानी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ऊर्स निमित्त मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी मोईन मियांचा आशीर्वाद घेतला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा