कोकण रेल्वेच्या सीेएमडी पदी संतोष कुमार झा यांची निवड

कोकण रेल्वेच्या सीेएमडी पदी संतोष कुमार झा यांची निवड

लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - कोकण रेल्वेच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संंचालकपदी (सीएमडी) संतोष कुमार झा यांची निवड करण्यात आली आहे. 
पब्लिक एंटरप्राईज सिलेक्शन बोर्डाने या पदासाठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये पाच उमेदवारांचा समावेश होता. त्यामधून संतोष कुमार झा यांची निवड करण्यात आली. ते 1992 च्या बँचचे इंडियन रेल्वे ट्रँफिक सर्व्हिस (आयआरटीएस) अधिकारी आहेत. 
झा हे सध्या कोकण रेल्वेच्या संचालक ( ऑपरेशन व कमर्शियल) पदावर कार्यरत आहेत. झा यांना कवितेची आवड असून ते प्रथितयश कवी आहेत. अनेक कवी संमेलन-मुशायरा मध्ये ते सहभागी झाले आहेत.  झा यांच्या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब