महापालिका उपायुक्त महेश आहेर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल

महापालिका उपायुक्त महेश आहेर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल 
ठाणे - प्रतिनिधी 
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त महेश आहेर यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ बनवणाऱ्यांविरोधात नौपाडा पोलिस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
आहेर यांनी मुंब्र्यातील एका कार्यक्रमात मित्रांसोबत असताना शायरी बोलतानाचा व्हिडिओ एडिट करुन त्यामध्ये आक्षेपार्ह बदल 
करून ती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली होती.  
या प्रकरणी आहेर यांनी नौपाडा पोलिसांत तक्रार केली असून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. आरोपी मु इम्रान हकीम व मोहम्मद रफिक मुल्ला यांच्याविरोधात नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये भा. दं. वि. कलम 500 व 501 अन्वये अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
हकीम व मुल्ला यांनी आहेर यांच्या शायरीच्या व्हिडिओमध्ये छेडछाड करुन आमदार जितेंद्र आव्हाड यांचा स्वीय सहाय्यक अभिजीत पवार व साथीदारांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयासमोर मारल्याचा व्हिडिओ जोडून व 
त्यामध्ये आक्षेपार्ह संवाद जोडून नवा व्हिडिओ तयार केला व व्हायरल केला. त्यामुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार आहेर यांनी पोलिसांत 
दाखल केली आहे.  
येत्या काही दिवसात या दोघांवर १ कोटीचा मानहानीचा दावा  टाकणार असल्याची माहिती महेश आहेर यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही