प्रताप होगाडे यांच्यासहित जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश

प्रताप होगाडे यांच्यासहित जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांचा समाजवादी पक्षात प्रवेश 

मुंबई - जनता दल धर्मनिरपेक्षचे प्रताप होगाडे यांच्यासहित पदाधिकाऱ्यांनी आज समाजवादी पक्षात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार रईस शेख, परवेज सिद्दीकी, अब्दुल रऊफ, राहुल गायकवाड उपस्थित होते. 


आझमी म्हणाले, आमचा पक्ष धर्मनिरपेक्षतेला महत्त्व देत आला आहे त्यामुळे विचारधारेच्या मुद्द्यावर जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. समाजवादी पक्ष नेहमीच हा लढत राहील, असा विश्वास आझमी यांनी व्यक्त केला. रेवण भोसले, डॉ. पी.डी. जोशी, साजदा निहाल अहमद, शिवाजीराव पारुलकर, नादेश आंबेडकर, कुमार राऊत यांच्यासहित असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी समाजवादी पक्षात प्रवेश केला. 

 

आमदार शेख म्हणाले, भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, सोलापूर आदी शहरातील यंत्रमाग उद्योग अत्यंत अडचणीत आहे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. 

वस्त्रोद्योगाबाबत व्यापक धोरण आखण्यात सरकारला अपयश आल्याची टीका त्यांनी केली. मुस्लिम आरक्षणासाठी समाजवादी पक्ष मोठा लढा उभारेल अशी घोषणा त्यांनी केली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही