उध्दव ठाकरेंना इतकी वर्षे मुंब्र्यातील शिवसैनिकांची काळजी नव्हती, स्थानिक आमदारासाठी ठाकरेंची भेट,राजन किणे यांचा आरोप

उध्दव ठाकरेंना इतकी वर्षे मुंब्र्यातील शिवसैनिकांची काळजी नव्हती, स्थानिक आमदारासाठी ठाकरेंची भेट,
राजन किणे यांचा आरोप
मुंब्रा - उबाठा शिवसेनेचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शनिवारी मुंब्रा भेटीवर येणार आहेत. खासदार संजय राऊत यांनी त्याबाबत ट्वीट केले आहे. त्यावर माजी नगरसेवक, शिवसेनेचे राजन किणे यांनी उध्दव ठाकरेंना इतकी वर्षे मुंब्रा येथील शिवसैनिकांची काळजी वाटली नाही. आता केवळ स्थानिक आमदाराच्या हस्तक्षेपामुळे ते मुंब्र्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

किणे म्हणाले, लोकशाहीमध्ये कोणीही कुठेही जाऊ शकतात. उध्दव ठाकरे कोणत्या शाखेत जाणार आम्हाला माहित नाही.
इथे त्यांची कोणतीही शाखा नाही. कदाचित त्यांची शाखा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात असेल तिथे ते भेट द्यायला येत असतील, ही शाखा आम्ही बनवली आहे, आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून ही शाखा तयार करण्यात आली होती. उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत यांना शिवसेनेची काही काळजी नाही. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत हातमिळवणी करुन शिवसेना  (उबाठा गट)  व राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना रसातळाला नेले असल्याची टीका त्यांनी केली. मुंब्रा येथील आमदाराच्या सांगण्यावरुन संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. इतक्या वर्षात शिवसैनिकांची कधी काळजी पक्षनेतृत्वाने केली नाही. केवळ आमदाराच्या सांगण्यावरुन ठाकरे मुंब्र्यात येत आहेत. ते शिवसैनिकांसाठी आले असले तर आम्ही त्यांचे लाल गालिचा अंथरुन स्वागत केले असते मात्र दुर्देवाने ते केवळ राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सांगण्यावरुन येत आहे, असे किणे म्हणाले. 
--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही