मुंब्र्यात चांद नगर परिसरात मोठा स्फोट, तीन जखमी, स्फोटाच्या कारणाबाबत साशंकता, तपास सुरु

मुंब्र्यात चांद नगर परिसरात मोठा स्फोट,  तीन जखमी, 
स्फोटाच्या कारणाबाबत साशंकता,  तपास सुरु
मुंब्रा - प्रतिनिधी 
मुंब्रा कौसा येथील चांद नगर परिसरात मुघल पार्क इमारतीत शनिवारी पहाटे मोठा स्फोट झाला. त्यामुळे सुमारे पाचशे मीटर परिसरात स्फोटाचे हादरे जाणवले.  या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरु करण्यात आली असून स्फोट नेमका कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.  
हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे इमारतीमधील सदनिकांच्या काचा फुटल्या व त्या काचा वेगाने उडाल्याने तीन व्यक्ती जखमी झाल्या.  त्यापैकी एका दहा वर्षीय मुलाच्या हाताला गंभीर जखम झाल्याने त्याला टाके घालावे लागले.  
इमारतीशेजारी पार्क केलेली मारुती कार स्फोटाच्या धक्क्याने पहिल्या मजल्यापेक्षा जास्त उंचीवर उडाली व पलिकडील बाजूला जावून पडली. 
पोलिस उपायुक्त गणेश गावडे, महापालिका उपायुक्त मनीष जोशी, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख यासीन तडवी, माजी नगरसेवक राजन किणे यांनी घटनास्थळी भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब