अभिनेत्री मीरा जोशीच्या ऑरेंज लिलीचे पोस्टर रिलीज, जिओ सिनेमा वर लवकरच प्रदर्शित होणार

अभिनेत्री मीरा जोशीच्या ऑरेंज लिलीचे पोस्टर रिलीज, जिओ सिनेमा वर लवकरच प्रदर्शित होणार,  मीराचा पहिला हिंदी चत्रपट
मुंबई - मराठमोळी अभिनेत्री-नृत्यांगणा मीरा जोशीच्या ऑरेंज लिली या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले. मीरा जोशीचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे.
मीराची यामध्ये प्रमुख भूमिका आहे. टायटल रोल असलेली त्यांची पहिली फिल्म आहे. हा एक सस्पेन्स थ्रीलर चित्रपट असून हा चित्रपट जिओ सिनेमावर लवकरच प्रदर्शित होणार आहे.

चित्रिकरणाबाबत मीरा जोशी म्हणाल्या, या चित्रपटाचे नाव असलेली ऑरेंज लिली पुले अत्यंत दुर्मिळ असल्याने चित्रिकरणासाठी खास काश्मिरमधून लिलीची फुले मागवली जात होती. या चित्रपटाच्या माध्यमातून प्रमुख भूमिका असलेला पहिला हिंदी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने मीरा अत्यंत आनंदी आहे. या चित्रपटाचे लेखक व डायरेक्टर समीर वंजारी आहेत तर प्रोड्युसर किरण राव व व्यंकटेश पवार आहेत. पुण्यातील खडकवासला येथे याचे चित्रिकरण झाले आहे.

याशिवाय जिद्दी सनम या चित्रपटामध्ये देखील मीरा जोशी प्रमुख भूमिकेत काम करत असून ती यामध्ये प्रसिध्द अभिनेता शारीब हाशमी सोबत काम करत आहे. या चित्रपटाच्या  चित्रिकरणाला सुरुवात झाली आहे. यामध्ये शर्मन जोशी ची देखील भूमिका आहे. हा एक क्राईम थ्रीलर ड्रामा असून मीरा यामध्ये पोलिसाची भूमिका करत आहे. या चित्रपटाचे
गणेश लोकरे असोसिएट डायरेक्टर आहेत तर अविनाश राजपूत डायरेक्टर आहेत. काही चित्रिकरण झाले असून सध्या दिवाळीनिमित्त ब्रेक आहे. दिवाळीनंतर या चित्रपटाचे दुबईमध्ये पुढील चित्रिकरण करण्यात येणार आहे. मीरा जोशीने याबाबत आनंद व समाधान व्यक्त केले. यामध्ये काम करत असलेल्या शारीबचा दरबान चित्रपट पाहून मीराने २०२० मध्ये शारीबला कौतुकाचा एसएमएस पाठवला होता त्यावेळी त्यांच्यासोबत काम करायला मिळेल असे वाटले नव्हते, अशी भावना मीराने व्यक्त केली आहे 

--

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही