राज्यातील सत्तेत असलेले भाजप सेनेचे पदाधिकारी आंदोलनाची भाषा करतात, तर दिवा टर्निंग येथील मद्यपींना हटविणार कोण? शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांचा सवाल

राज्यातील सत्तेत असलेले भाजप सेनेचे पदाधिकारी आंदोलनाची भाषा करतात, तर दिवा टर्निंग येथील मद्यपींना हटविणार कोण?  शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांचा सवाल 
लोकमानस प्रतिनिधी 
मुंब्रा :- पोलीस खाते हे भाजपच्या हातात आहे आणि राज्यात शिंदे - भाजपची सत्ता आहे, मग दिव्यातील नाक्यावर दारू पिणाऱ्या मद्यपींना हटवणार कोण? असा खरमरीत सवाल  शिवसेनेचे (उबाठा) दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी विचारला आहे.

 शिवसेनेचे उपशहर प्रमुख शैलेश पाटील यांनी दिवा टर्निंग येतील उघड्यावर  दारू पिणाऱ्या मद्यपींना हटवण्याची मागणी आठ दिवसापूर्वी केली होती. त्यानंतर राज्यात सत्तेत असणाऱ्या व गृहमंत्री पद असणाऱ्या भाजपने दिवा टर्निंग येथील खुल्या मैदानात बसणाऱ्या मद्यपींना हटवा, अशी मागणी पोलिसांना निवेदन देऊन केली आहे. त्याच्यावर मुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. 

ज्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे, त्याच पक्षाचे लोक स्टंट करत असतील तर मग दिवा टर्निंग वरील मद्यपीना हटविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत का? असा टोला मुंडे यांनी लगावला आहे. शिंदे भाजप सरकारने एक फोन करून पोलिसांना सांगितले तरी येथील दारुडे हटविले जातील पण असे का केले जात नाही? याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी जनतेला द्यावे असे मुंडे यांनी म्हटले आहे. सत्तेत असणारेच आंदोलनाची नौटंकी करत असतील तर उघड्यावर दारू पिणाऱ्या मद्यपींना नेमके हटवणार कोण? असा सवाल  रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही