शिळ शालिमार ढाब्या जवळील रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी

 शिळ शालिमार ढाब्या जवळील रस्त्यावर गतिरोधक बसवा, 

अंजुमन एज्युकेशन अॅन्ड वेलफेअर सोसायटीची सहाय्यक आयुक्तांकडे मागणी 

लोकमानस प्रतिनिधी 

मुंब्रा - शिळ शालिमार ढाब्या जवळील रस्त्यावर गतिरोधक बसवा, अशी मागणी अंजुमन एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीने दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे. 

दिवा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या सिल्व्हर लाईन नाईस पार्क, नाईस गार्डन, नाईस सिटी, ग्रीन पार्क येथील रस्त्यांवर अतिशय वेगाने दुचाकी तसेच कार व अवजड वाहनांची रहदारी सुरु असते. त्यामुळे जेष्ठ नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना व नोकरीसाठी ये-जा करणाऱ्यांना रस्त्यावरून चालत असताना त्रास सहन करावा लागतो. या भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंब्रा शहरातून येणाऱ्या तसेच जाणाऱ्या भरधाव वेगातील गाड्यांकरिता या ठिकाणी गतिरोधक तातडीने बसविण्यात यावेत, जेणेकरून रस्त्यावरून जाणान्या नागरिकांना दिलासा मिळेल.

सदर नाईस पार्क या ठिकाणी एक शाळा तसेच एक ज्युनिअर कॉलेज तसेच मोठ-मोठाले गृहसंकुल अस्तित्वात आहेत, शाळा-कॉलेज ला जाणारे विद्यार्थी व पालक, शिक्षक वर्गाला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पाहता रस्त्यावर तातडीने गतिरोधक बसविण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. अंजुमन एज्युकेशन अॅण्ड वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष अल्लाबक्ष काझी यांनी याबाबत सहाय्यक आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही