भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या लढ्याला यश, जेट एअरवेज कामगारांना २० वर्षानंतर न्याय

भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या लढ्याला यश, 
जेट एअरवेज कामगारांना २० वर्षानंतर न्याय
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने जेट एअरवेजच्या 
169 कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. 
जेट एअरवेजने फिक्स्ड टर्म कॉन्ट्रक्टच्या १६९ कामगारांना कामावरुन कमी केले होते. या अन्यायाविरुध्द भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने कायदेशीररित्या केंद्रीय सरकार औद्योगिक न्यायालयात लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयात सुध्दा दाद मागितली परंतु काहीही दिलासा मिळाला नव्हता. शेवटी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने १६९ कामगारांना संपूर्ण पगारासहीत कामावर घेण्याचे आदेश देताना केंद्रीय सरकार औद्योगिक न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश रद्द केले व कामगारांना संपूर्ण पगारासहीत कामावर घेण्याचे आदेश देताना त्यांना कायम कामगार म्हणून जेट एअरवेजला मान्यता देण्यास सांगितले.

न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या खटल्यांमध्ये या न्यायालयीन लढाईमध्ये महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर सल्लागार अॅड् जी. एस. बज, कोषाध्यक्ष एस. आर. सावंत आणि सचिव चंद्रशेखर पट्ण यांनी कामगारांच्या हितासाठी कामकाज पाहिले. क्रेंद सरकारच्या बदलत्या कामगार कायदयाच्या प्रयत्नात या कामगार लढयाला खूप महत्व असून यामुळे कामगारांची रोजीरोटी वाचल्यामुळे जेट एअरवेज कामगारांनी भा. का. क. महासंघाचे व न्यायालयाचे आभार मानले,  अशी माहिती महासंघाचे प्रसिध्दी प्रमुख प्रवीण मंत्री यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही