सुन्नी दावते इस्लामीचा शुक्रवारपासून तीन दिवसीय इज्तेमा, यंदाचे ३१ वे वर्ष

सुन्नी दावते इस्लामीचा शुक्रवारपासून तीन दिवसीय इज्तेमा, यंदाचे ३१ वे वर्ष  
 प्रतिनिधी 
मुंबई - सुन्नी दावते इस्लामीच्या वार्षिक इज्तेमाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. तीन 
दिवसीय चालणाऱ्या या इज्तेमाचा रविवारी सुर्यास्तानंतर सामूहिक प्रार्थनेने समारोप होईल. यंदाचे इज्तेमाचे ३१ वे वर्ष आहे. शुक्रवारी दुपारच्या नमाजनंतर या इज्तेमाला सुरुवात होईल. शुक्रवारी केवळ महिलांसाठी इज्तेमा असेल तर शनिवार व रविवारी केवळ पुरुषांसाठी वेळ राखीव आहे. या इज्तेमामध्ये जगभरातील इस्लामिक तज्ज्ञ वाख्यानांच्या व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करतील. संपूर्ण मानवजातीसाठी शांती व समृध्दीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येईल, इज्तेमाच्या द्वारे शांतता व जातीय सलोख्याचा संदेश दिला जाईल. 
मौलाना शाकीर नुरी, सय्यद मोईनुद्दीन अश्रफ (मोईन मिया), कारी रिझवान खान, कमरुल जमा खान आझमी, कारी जहीरुद्दीन खान, मुफ्ती निजामुद्दीन रजवी, अर्शद मिस्बाही, सय्यद अमीनुल कादरी, जहीरुद्दीन मिस्बाही, जावेद अख्तर मिस्बाही, जामी रझा अजहरी, सज्जाद नजमी, सादिक रजवी हे मौलाना यामध्ये मार्गदर्शन करतील. 
 महिलांना शुक्रवारी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत व पुरुषांना शनिवारी व रविवारी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सहभागी होता येईल. 
स्त्री शिक्षणाचे महत्त्व आणि त्यांची भूमिका, वडिलांच्या व पतीच्या मालमत्तेत महिलांचा वाटा, कपड्यांचे इस्लामिक शिष्टाचार व महिलांची नम्रता या विषयांवर त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तर पुरुषांच्या इज्तेमामध्ये उच्च शिक्षणाद्वारे राष्ट्राचा विकास, बंधुता व एकता ही राष्ट्राच्या यशाची गुरुकिल्ली, प्रेषित मोहम्मद यांच्यावर प्रेम करणे व त्यांचे अनुसरण करणे, राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन प्रभुत्वाच्या युगात आपली सामाजिक व धार्मिक जबाबदारी, करिअर मार्गदर्शन व उच्च शिक्षण समुपदेशन यावर मार्गदर्शन करण्यात येईल, अशी माहिती मोहम्मद शाहीद यांनी दिली.   
महिला व पुरुषांना भेडसावणाऱ्या कौटुंबिक व सामाजिक समस्या, सध्याच्या सामाजिक व आर्थिक व्यवहाराच्या समस्या यावर मुफ्ती निजामुद्दीन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही