काँग्रेस पक्ष संविधानाच्या एक लाख प्रतींचे वाटप करणार, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते एक लाख संविधान प्रती वाटपाचा शुभारंभ होणार

काँग्रेस पक्ष संविधानाच्या एक लाख प्रतींचे वाटप करणार,  
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते एक लाख संविधान प्रती वाटपाचा शुभारंभ होणार
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ असे संविधान दिले आहे. संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क दिले आहेत. आपल्या संविधानाची सर्वांनी माहिती झाली पाहिजे यासाठी संविधान दिनाचे औचित्य साधून राज्यभर संविधानांच्या एक लाख प्रति वितरीत करण्याचा शुभारंभ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी केला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना हत्तीअंबीरे म्हणाले की, संविधान वाटपाच्या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाचे समन्वयक के. राजू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या एससी विभागाचे चेअरमन राजेश लिलोठीया व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री आ. वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थिती असेल. हा कार्यक्रम बी.एम, वैद्य सभागृह, हिंदू कॉलनी, दादर येथे २६ नोव्हेंबर रोजी होत आहे. याच दिवशी संविधान गौरव दिन साजरा केला जाणार आहे तसेच संविधानची गाणी अनिरुद्धची वाणी, हा संविधान पहाट कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही