मनोज जरांगेंचे आंदोलन मागे, सरकारला दिली 2 जानेवारी पर्यंतची मुदत

मनोज जरांगेंचे आंदोलन मागे,  सरकारला दिली 2 जानेवारी पर्यंतची मुदत
मुंबई - मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी 9 दिवस चाललेले आपले उपोषण मागे घेतले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची कार्यवाही करण्यासाठी त्यांनी सरकारला 2 जानेवारी पर्यंतचा वेळ दिला आहे.  
सरकारच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी गावात जावून जरांगे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत सरकारला  वेळ दिला आहे. 
वेळ घ्या पण आरक्षण द्या, असे ते म्हणाले.  मराठा आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीने जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती दिली. 
जरांगेच्या भेटीला गेलेल्या मंत्र्यांच्या शिष्टमंडळात उदय सामंत, धनंजय मुंडे, अतुल सावे,  संदीपान भुमरे व माजी मंत्री बच्चू कडू यांचा समावेश होता. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब