मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ९ डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

 मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ९ डिसेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

लोकमानस प्रतिनिधी

मुंबई - 

 मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे येत्या 9 डिसेंबर रोजी शहरातील सर्व नगर व दिवाणी न्यायालय, तसेच मुख्य महानगर दंडाधिकारी, मोटार अपघात प्राधिकरण, राज्य सहकार अपिलीय न्यायालय येथे लोकन्यायालयाने आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे तडजोडपात्र फौजदारी आणि सर्व प्रकारचे दिवाणी दावे तडजोडीने संपुष्टात आणण्यात येणार आहेत. 

नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी व इतर न्यायालयातील न्यायाधीश व कर्मचारी हे लोकन्यायालयाच्या अनुषंगाने नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबईचे प्रधान न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई अध्यक्ष  अनिल सुब्रम्हण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. 

गेल्या वर्षभरात लोकन्यायालयाच्या माध्यमातून ३० हजारांहून अधिक प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. लोकन्यायालयाचा अनेक पक्षकारांना लाभ झाला असून त्याच्यामधील दावे व वाद कायमस्वरूपी संपुष्टात आल्यामुळे उभयतांचे संबंध टिकून  राहिले आहेत. लोकन्यायालय हे वाद संपुष्टात आणण्यासह नाते संवर्धित करते, असे  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबईचे सचिव अनंत देशमुख म्हणाले. 


फौजदारी खटले या लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत. मुंबई येथील लोकन्यायालय हे प्रलंबित आणि दाखलपूर्व  दावे तसेच खटले संपुष्टात आणण्याचे प्रभावी माध्यम आहे. या प्रक्रियेमुळे वेळ, पैसा आणि श्रम याची बचत होते.  तसेच वाद  कायमस्वरुपी उभय पक्षकारांच्या संमतीने संपुष्टात आणला जातो. प्रलंबित प्रकरणे आणि खटले तडजोडीने संपुष्टात आणण्यासाठी 9 डिसेंबर रोजीच्या राष्ट्रीय लोकन्यायालयाचा पक्षकार, विधिज्ञ यानी लाभ घ्यावा, असे आवाहन  नगर दिवाणी व सत्र न्यायालय, मुंबईचे  प्रधान जिल्हा न्यायाधीश तथा मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल सुब्रम्हण्यम यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही