मुंब्रा मध्ये संविधान दिवस साजरा, संविधानाच्या प्रतींचे वितरण, संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन

मुंब्रा मध्ये संविधान दिवस साजरा, संविधानाच्या प्रतींचे वितरण, संविधानाच्या उद्देशिकेचे जाहीर वाचन 
मुंब्रा : प्रतिनिधी 
मुंब्रा मध्ये भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दर्गाह रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व महिलांना संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. संविधानाच्या  उद्देशिकेचे यावेळी जाहीर वाचन करण्यात आले. तसेच 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली.  
 देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे 
कामकाज संविधानानुसारच चालते. संविधानाचे 
महत्त्व अनन्यसाधारण असे आहे, त्यामुळे संविधानाला वाचवणे महत्त्वाचे आहे, असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला. महिलांचे हक्क, अल्पसंख्याकांचे हक्क व इतर तरतुदींबाबत उपस्थितांनी यावेळी मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या
मर्झिया शानु पठाण व साकिब दाते यांच्या पुढाकाराने  करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थितांना संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. तसेच ज्या इच्छुकांना संविधानाच्या प्रती हव्या असतील त्यांना पठाण यांच्या कार्यालयातून प्रत दिली जाईल, असे मर्झिया पठाण यांनी जाहीर केले.  
संविधानाच्या महत्त्वाबाबत यावेळी माहिती देण्यात आली. संविधानाने दाखवलेल्या मार्गाप्रमाणे देशाची आजपर्यंत वाटचाल सुरु आहे, त्यामुळे त्याचा सर्वांनी आदर करणे गरजेचे 
आहे, असे मत यावेळी मांडण्यात आले. 
संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन कार्यक्रमाची सांगता झाली. 

यावेळी अँड अश्रफ फकीह, इस्माईल शेख 
नाझमीन शेख, दिपाली कदम,  प्रजा भोईर,  मयुरा आहिर, सैफ मर्चंट, आदिल मोदी व खलील गिरकर या वकिलांचा सत्कार करण्यात आला. 
उपस्थितांच्या हस्ते यावेळी संविधानाच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. 

यावेळी मर्झिया शानु पठाण म्हणाल्या, संविधानाबाबत प्रत्येक भारतीय नागरिकाला माहिती असणे गरजेचे आहे. आज आपण  संविधानाला वाचवले तर संविधान आपल्याला वाचवेल. सर्वसामान्य नागरिकांना संविधान व त्यातील तरतुदींबाबत माहिती असणे गरजेचे आहे. नागरिकांना संविधानाने दिलेले हक्क, तसेच कर्तव्य व जबाबदारी यांची माहिती असणे आवश्यक आहे व त्याप्रमाणे अंमलबजावणी  करण्याची गरज आहे. संविधानाबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस पठाण यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही