दिवा शहरातील बेतवडे गाव ते शिर्डी साई पदयात्रा पालखीचे प्रस्थान

दिवा शहरातील बेतवडे गाव ते शिर्डी साई पदयात्रा पालखीचे प्रस्थान
लोकमानस प्रतिनिधी 
दिवा:- दिवा बेतवडे गाव येथील ओम साई सेवा मंडळ (रजि) बेतवडे आयोजित साईबाबा मंदिर येथून बेतवडे गाव ते शिर्डी साई पदयात्रा पालखीचा प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साह आनंदात साजरा झाला. 
यंदाचे मंडळाचे 12 वे वर्ष असून 150 भाविक पालखी बरोबर असून 9 ते 10 दिवस पायी चालत साई नामाचा जय घोष करत साईभक्त मोठ्या उत्साहात पदयात्रेत सहभागी झाले. 
सोमवारी 4 डिसेंबर 2023 रोजी श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचतील असे मंडळाचे अध्यक्ष विजय गणपत भोईर यांनी सांगितले. या पालखीचे आयोजक सुधाकर पाटील, खजिनदार किशोर पाटील, सल्लागार मधुकर पाटील तर सचिन जयराम पाटील हे आहेत. 
 सदर सोहळ्यास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले.  याप्रसंगी दिवा शहरातील अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील, शहर संघटक रोहिदास मुंडे, युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर,उपशहर प्रमुख वैष्णव पाटील,  तेजस पोरजी, नवनीत पाटील,  चेतन पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही