मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा शिवसैनिकांनी घेतली ताब्यात, उबाठा गटाला धक्का

मुंब्रा येथील शिवसेनेची शाखा शिवसैनिकांनी घेतली ताब्यात, 
उबाठा गटाला धक्का 
मुंब्रा - शिवसेना (उबाठा)  गटाच्या ताब्यात असलेल्या मुंब्रा येथील शाखेचा ताबा गुरुवारी शिवसैनिकांनी घेत शाखा हस्तगत केली. 
ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक राजन किणे, शिवसेनेचे कल्याण ग्रामिणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यावेळी उपस्थित होते. विभाग प्रमुख महेश किणे,  शहर अध्यक्ष मुबीन सुर्वे, आझाद चौघुले एफ एम इलियास, महिला आघाडीच्या लता पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित शिवसैनिकांनी ही शाखा ताब्यात घेतली. 

याप्रकरणी राजन किणे म्हणाले, शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  खासदार डॉ 
श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार आम्ही या शाखेचा ताबा घेतला आहे.  ही बंद पडलेली शाखा आम्ही लवकरच पुन्हा कार्यरत करुन नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहू.  
गेल्या काही काळापासून ही शाखा बंद होती,  त्यामुळे नागरी हिताची कामे बंद होती आता या कामांना चालना मिळेल,  असा विश्वास किणे यांनी व्यक्त केला. 
न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत असल्याचा निर्णय दिला आहे.  त्यानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उबाठा गटाचे शहरप्रमुख विजय कदम यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला व भविष्यात आपण पुन्हा शाखेचा ताबा घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही