ज्योती पाटील यांना भाजप महिला मंडल अध्यक्ष पदावरून हटवले, महिलांमध्ये नाराजी

 ज्योती पाटील यांना भाजप महिला मंडल अध्यक्ष पदावरून हटवले, महिलांमध्ये नाराजी
लोकमानस प्रतिनिधी 
दिवा:-दिव्यातील तीव्र पाणीटंचाईवर आक्रमकपणे भूमिका घेत महापालिका मुख्यालयावर पाणी हक्क आंदोकानाद्वारे धडक देणाऱ्या व दिव्यातील महिलांचे प्रश्न सातत्याने मांडणाऱ्या ज्योती पाटील यांना भाजपने महिला मंडळ अध्यक्ष पदावरून हटवल्याने महिला वर्गात नाराजी आहे.
ज्योती पाटील या पक्षाचे काम विविध उपक्रम राबवून करत असताना नव्या मंडळ कार्यकारणी मध्ये त्यांना महिला मोर्चा अध्यक्ष पदावरून  डावल्याने दिव्यातील राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण तयार करून विविध प्रश्न हातात घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजप मध्ये जाणूनबुजून खच्चीकरण केले जात असल्याची चर्चा आता दिव्यात रंगली आहे. दिवा भाजपचे दोन मंडळ अध्यक्ष पक्ष सोडून शिवसेनेत गेल्यानंतर ज्योती पाटील यांनी पाचशे महिलांसोबत भाजप मध्ये प्रवेश केला होता.पक्ष अडचणीत असताना पक्षाला उभारी देण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी किमान तीन वर्षांचा कार्यकाळ पण दिला जात नसेल तर उपयोग काय?असा सवाल ज्योती पाटील यांच्या समर्थक महिला विचारात आहेत.
ज्योती पाटील यांनी तन्वी फौंडेशनच्या माध्यमातून दिव्यात महिलांचे मोठे संघटन निर्माण केले आहे.असे असतानाही सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या ज्योती पाटील यांना पदावरून हटवले गेल्याने महिला वर्गात नाराजी आहे.

महिलांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणाऱ्या ज्योती पाटील यांना का हटवले?
ज्योती पाटील या पक्षाचे काम निष्ठेने करत होत्या. त्यांनी महिलांचं संघटन मोठ्या ताकदीने दिव्यात उभे केले.महिलांच्या प्रश्नावर लढणारे एकमेव नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. दिव्यातील महिलांना सर्वाधिक समस्या भेडसावतात.त्या विरोधात त्यांनी आवाज उठवला.असे असताना त्यांना पदावरून का हटवले? - मानसी राणे,रहिवासी

ज्योती पाटील यांना दुसऱ्यांदा डावलले 

 या आधीही ज्योती पाटील यांना 2017 च्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांनी अनेक कार्यक्रम राबवून पक्षाची ताकद वाढवली,पण शेवटच्या टप्प्यात त्यांना तिकीट नाकारले गेले. दिवा भाजपमध्ये दोन मंडल अध्यक्ष पद सोडून गेल्यानंतर 500 महिलांना सोबत घेऊन आलेल्या ज्योती पाटील यांनी वर्षभर विविध उपक्रम व पक्षाचे काम केल्यानंतरही नव्या कार्यकारणी संधी देण्यात आली नाही.दुसऱ्यांदा त्यांना डावलल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही