मुंब्रा येथील शिवसेना शाखेचे भूमीपूजन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार

मुंब्रा येथील शिवसेना शाखेचे भूमीपूजन, नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार
मुंब्रा -  
मुंब्रा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेचे भूमीपूजन आज मोठ्या उत्साहात करण्यात आले. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे व ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राजन किणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे भूमीपूजन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी मुंब्रा येथील शाखेचा ताबा शिवसैनिकांनी उबाठा गटाकडून घेतला होता, त्यानंतर ती शाखा नुतनीकरणासाठी जमीनदोस्त करण्यात आली होती.
यावेळी गोपाळ लांडगे म्हणाले, या शाखेची स्थापना स्व.आनंद दिघे यांनी स्थापन केली होती. मात्र ती शाखा मोडकळीला आल्याने ती नुतनीकरणासाठी तोडण्यात आली. आज शाखेचे भूमीपूजन करण्यात आले असून दोन महिन्यात याचे काम पूर्ण केले जाईल व नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी १ जानेवारी २०२४ ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

 राजन किणे म्हणाले, ही शाखा अत्यंत चांगली बनवण्यात येईल व या शाखेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडवल्या जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या शाखेच्या माध्यमातून सामाजिक कार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. खासदार शिंदे हे या शाखेत सर्वसामान्यांसाठी उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही