संकल्प प्रतिष्ठानतर्फे कणकवली येथे नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

संकल्प प्रतिष्ठानतर्फे कणकवली येथे
नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
लोकमानस प्रतिनिधी 
कणकवली - 
संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे
नाविण्यपूर्ण करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 
करवंटी हस्तकला प्रशिक्षण  १४ ते १६ डिसेंबर  या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत कणकवली, (जि.सिंधुदुर्ग) येथे संपन्न होत आहे. 

नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष मानतो. या झाडाचा प्रत्येक भाग उपयोगात आणला जातो, मात्र करवंट्या (मोठ्या प्रमाणावर) जाळून टाकल्या जातात. समुद्र किनारी भागात नारळाची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे, साहजिकच नारळाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे करवंट्या ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात. 
या करवंट्या जाळण्याऐवजी त्यापासून सुंदर, आकर्षक उपयुक्त व मागणी असणा-या वस्तूंची निर्मिती करता येते व हे एक अर्थार्जनाचे साधनही ठरू शकते. गरज आहे ती याकडे डोळसपणे पाहण्याची. दुर्दैवाने मात्र आपल्या भागात याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
गेले एक तप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकता विकास या क्षेत्रात प्रामुख्याने कार्यरत असणाऱ्या व त्या अनुषंगाने उद्योग, व्यवसाय, कृषी विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे यशस्वीपणे आयोजन करणाऱ्या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) या संस्थेने ही बाब हेरून करवंटी हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
हे प्रशिक्षण नेहमीप्रमाणेच प्रात्यक्षिकवर आधारित असून तामीलनाडू राज्यातील व या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. 

या सुवर्ण संधीचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा. या प्रशिक्षणासाठी मर्यादित जागा असून प्रथम नोंदणी करणा-या  फक्त ३० जणांनाच माफक  प्रशिक्षण शुल्क आकारून प्रवेश दिला जाणार आहे. प्रशिक्षण पश्चात प्रशिक्षणार्थींना संकल्प प्रतिष्ठान द्वारा मार्गदर्शन व मार्केटिंगसाठी सहाय्य केले जाणार आहे. 
इच्छुक व्यक्तींनी अधिक माहितीसाठी व प्रवेश निश्चित करण्यासाठी  CSC01 हा कोड ९४०५७७८०९४ यावर व्हाटसअप करावा किंवा संपर्क साधावा असे आवाहन संस्थेद्वारे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही