समता क्रिडा भवन आणि मुंबई उपनगर खो-खो संघटना संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेला चांगला प्रतिसाद, महिला-पुरुष अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा संपन्न

समता क्रिडा भवन आणि मुंबई उपनगर खो-खो संघटना संयुक्त विद्यमाने आयोजित स्पर्धेला चांगला प्रतिसाद
महिला-पुरुष अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा संपन्न
मुंबई - 
महिला/पुरुष अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा 2023 चे आयोजन नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात आले होते. 
 समता क्रीडा भवन कांदिवली पश्चिम या ठिकाणी करण्यात आले होते. स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा माजी मंत्री, विधानपरिषदेचे आमदार  विजय (भाई) गिरकर  यांच्या हस्ते करण्यात आला. 

या स्पर्धेच्या निमित्ताने माजी नगरसेविका अ‍ॅड. प्रतिभा गिरकर, माजी नगरसेविका प्रियांका मोरे, समता क्रीडा भवनाचे कार्यवाह  संजय बाविस्कर , डॉ.नरेंद्र कुंदर (सचिव मुंबई उपनगर खो-खो संघटना),  सुचित येद्रें (खजिनदार), स्पर्धा संयोजक  हेमंत  दुसार यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक डॉ.नरेंद्र कुंदर, शिवछत्रपती पुरस्कार व वीर अभिमन्यू व एकलव्य पुरस्कार प्राप्त खेळाडू दिनेश मोरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू  हर्षद हातणकर, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू  अनिकेत पोटे व एकलव्य पुरस्कार प्राप्त खेळाडू गणेश सावंत, वीर अभिमन्यू पुरस्कार प्राप्त खेळाडू . शैलेश गुरव  यांचा आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 
स्पर्धेमध्ये 20 पुरुष संघ आणि महिलांचे 14 अशा एकूण 34 संघांचा सहभाग आहे. स्पर्धेच्या चारही दिवशी प्रेक्षक, क्रीडारसिक यांचा छान प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील पुरुष गटात विजेतेपद शिर्सेकर महात्मा गांधी (बांद्रा) तर उपविजेतेपद श्री सह्याद्री संघ (भांडुप), तृतीय क्रमांक प्रबोधन क्रीडा भवन (गोरेगाव), चतुर्थ क्रमांक शिर्सेकर महात्मा गांधी (बांद्रा) यांनी पटकावले. महिला गटात विजेतेपद शिर्सेकर महात्मा गांधी (बांद्रा) तर उपविजेतेपद दत्तासेवा क्रीडा मंडळ (गोरेगाव), नुकताच संपन्न झाला. तृतीय  क्रमांक श्री सह्याद्री संघ (भांडुप), चतुर्थ क्रमांक ओम युवा स्पोर्ट्स क्लब (बोरिवली) यांनी पटकावला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही