समाजवादी पक्षाच्या मुंब्रा कळवा अध्यक्षपदी अब्दुल मन्नान शेख यांची नियुक्ती

समाजवादी पक्षाच्या मुंब्रा कळवा अध्यक्षपदी अब्दुल मन्नान शेख यांची नियुक्ती
मुंब्रा - समाजवादी पक्षाच्या मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी अब्दुल मन्नान शेख यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांच्या हस्ते शेख यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

पक्षाच्या नेतृत्वाने आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र ठरुन समाजवादी पक्षाला चांगले यश मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन व या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास आपले प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया मन्नान शेख यांनी व्यक्त केली. शेख यांच्या नियुक्तीबद्दल मुंब्रा येथील पक्षाच्या कार्यालयात त्यांचे पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतर्फे अभिनंदन करण्यात आले. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब