पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मुंब्र्यात महिला करणार सामूहिक प्रार्थना, मर्झिया पठाणकडून आयोजन

पॅलेस्टिनी नागरिकांसाठी मुंब्र्यात महिला करणार सामूहिक प्रार्थना,

 मर्झिया पठाणकडून आयोजन 

मुंब्रा - पॅलेस्टाईनवर होत असलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या व मृत्यू पावलेल्या नागरिकांसाठी मुंब्रा मध्ये महिला सामूहिक प्रार्थना करणार आहेत. मर्झिया शानु पठाण यांनी याचे आयोजन केले आहे. पॅलेस्टाईनमधील हल्ल्याला एक महिना उलटून गेला आहे. 

९ नोव्हेंबर ला दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत अमृतनगर येथील दादी कॉलनी मधील पिंट्या ग्राऊंड मध्ये ही प्रार्थना केली जाईल. या सामूहिक प्रार्थनेमध्ये मुंब्रा कौसा मधील महिला, तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मर्झिया पठाण यांनी केले आहे. गाझा व पॅलेस्टाईन मध्ये सुरु असलेल्या कारवाई विरोधात केंद्र सरकारने आवाज उठवावा, केंद्र सरकारने देखील पॅलेस्टाईनला पाठिंबा  द्यावा, अशी मागणी पठाण यांनी केली. आता पर्यंतच्या केंद्र सरकारांनी नेहमीच इस्त्राईलला विरोध केला आहे व पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब