मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांसोबतचर्चा, मुस्लिम समाजाच्या शिक्षण,आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा

  मौलाना आझाद विचार मंचचे अध्यक्ष माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांसोबत
चर्चा,  
मुस्लिम समाजाच्या शिक्षण,आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नांवर चर्चा
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई 

माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखाली मौलाना आझाद विचार मंचच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे शिक्षण,आरक्षण आणि संरक्षणाच्या प्रश्नावर निवेदन सादर करून व्यापक चर्चा केली. भारतीय संविधान देशाला समर्पित होवून ७४ वर्षे झाली.पण मुस्लिम समाजाला न्याय व समानता देताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी केला.
    शिक्षण आणि रोजगार क्षेत्रात मुस्लिम समाजाची दयनीय स्थिती असून  सरकारी व खाजगी नोकरीमध्ये त्याचे प्रतिनिधित्व कमी होत चालले आहे,त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले.  गोपाल सिंग आयोग,सच्चर समिती,रंगनाथ मिश्रा आयोग आणि डॉ. मेहमूदुर्रहमान समितीच्या शिफारशींचा उल्लेख करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी त्यांनी केली.
   १५ कलमी कार्यक्रमाची कृतिशील अंमलबजावणी,बार्टी-महाज्योतीप्रमाणे मुस्लिम समाजासाठी मौलाना आझाद रिसर्च सेंटर ट्रेनिंग सेंटरची स्थापना करावी, मुस्लिमांना शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती द्यावी,त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करावा,जिल्हा पातळीवर वसतिगृहे,राज्यातील वक्फ संपत्तीचा मुस्लिमांच्या शिक्षणासाठी विनियोग करावी, जात निहाय जनगणना करताना मुस्लिम ओबीसी प्रवर्गातील जातीची वेगळी जनगणना करावी,राज्य मागासवर्ग आयोगातर्फे होणाऱ्या सर्वेक्षणात मुस्लिम समाजाचासुद्धा समावेश करावा आदी मागण्यावर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर मुस्लिम-मागासवर्गीयांचे होत असलेले माॅब लिंचींग व जाणीवपूर्वक राज्यात पसरविले जात असलेल्या दंगली यावर उपाय करावेत व दंगलीत नुकसान झालेल्यांना व निश्पाप जीव गमावलेल्यांना योग्य निधी देवून पुनर्वसन करावे व नोकऱ्या द्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली.
   यावेळी  मौलाना आझाद विचार मंचाचे प्रदेश उपाध्यक्ष हसीब नदाफ, ऐनूल अत्तार(उपाध्यक्ष),अजीज पठाण (अध्यक्ष,मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती), डॉ.दानिश लांबे(विभागीय अध्यक्ष)फैजुला खान(मुंबई अध्यक्ष)अजमल खान (मुस्लिम रिझर्वेशन फ्रंट), मुज्जमील खान,शकील सिद्दिकी,खलील सय्यद (जनरल सेक्रेटरी), मो.अय्युब शेख, रफिक साबिर,अख्तर शेख,सैफ हाश्मी व 
मौलाना आझाद विचार मंचाचे ऑफिस सेक्रेटरी राजू देशमुख आदींचा समावेश होता.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही