मॅक्स मार्शल आर्ट स्पर्धेला चांगला प्रतिसाद, २०० स्पर्धकांनी घेतला सहभाग

मॅक्स मार्शल आर्ट स्पर्धेला चांगला प्रतिसाद, २०० स्पर्धकांनी घेतला सहभाग
मुंब्रा- मुंब्रामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मॅक्स मार्शल आर्ट स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला व आपल्या कौशल्याचे सादरीकरण केले. प्रशिक्षक याकूब खान यांच्या मार्गदर्शनाखाली आझमी फाऊंडेशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांपासून मोठ्या तरुणांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला.

यामध्ये प्रथम क्रमांक सय्यद अफसर, द्वितीय क्रमांक आलम इद्रिसी, तृतीय क्रमांक सलीम खान, चतुर्थ क्रमांक रिझवान खान, पाचवा क्रमांक अल सामी, सहावा क्रमांक हुदा सय्यद व सातवा क्रमांक अरविंद यांना देऊन गौरवण्यात आले. या प्रशिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक पदके मिळवली. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत त्यांना गौरवण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शब्बीर खान, अझीम शेख, ठाणे महापालिकेच्या परिवहन समितीचे सदस्य शमीम खान उपस्थित होते.
शब्बीर खान म्हणाले, मुलांना व्यसनांपासून व वाईट सवयींपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना शिक्षणासोबत विविध खेळांसाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मुंब्रा कौसा मध्ये एमएमए, कराटे अशा खेळांचा प्रसार करण्यामध्ये याकूब खान यांनी मोठे योगदान दिल्याचे कौतुकोद्गार शमीम खान यांनी काढले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही