पोस्ट्स

डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

8 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे बोरिवलीत उत्तर भारतीय संमेलन

इमेज
8 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे बोरिवलीत उत्तर भारतीय संमेलन लोकमानस प्रतिनिधी  मुंबई  दि. 31 - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर भारतीय आघाडी च्या वतीने नविन वर्षात येत्या 8 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता बोरिवली पश्चिम गोराई येथील गणेश मंदिरा जवळच्या गोराईचा राजा मैदान येथे उत्तर भारतीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे,उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष श्यामधर दुबे, उत्तर भारतीय आघाडीचे मुंबई अध्यक्ष हरिहर यादव, उत्तर भारतीय आघाडी चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रमेश गौड यांनी दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत रिपाइंच्या नेत्यांनी ही माहिती दिली.       रिपब्लिकन पक्षाने नेहमी उत्तर भारतीयांना साथ दिली आहे. मुंबईतील उत्तर भरतीयांच्या झोपड्या घरांच्या पात्रतेसाठी; फेरीवाले ; टॅक्सीवाले; कष्टकरी  कामगार म्हणून मुंबईत रोजीरोटी साठी कष्ट करणाऱ्या उत्तर भारतीयांना नेहमी त्यांच्या अडीअडचणीत रिपब्लिकन पक्षाने साथ दिली आहे.त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीयांचा  रिपब्लिकन नेत

ई केवायसी न झाल्यास रेशन कार्ड बंद होणार नाही, रेशनिंग अधिकाऱ्यांची मुस्लिम लीगच्या शिष्टमंडळाला ग्वाही, ई केवायसी पूर्ण करण्यासाठी रविवारी देखील शिधावाटप दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना

इमेज
  ई केवायसी न झाल्यास रेशन कार्ड बंद होणार नाही, रेशनिंग अधिकाऱ्यांची मुस्लिम लीगच्या शिष्टमंडळाला ग्वाही, ई केवायसी पूर्ण करण्यासाठी रविवारी देखील शिधावाटप दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना मुंब्रा - शिधापत्रिकेसाठी ई केवायसी न केल्यास शिधापत्रिका रद्द होणार नाही, मात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या शिधावाटप दुकानात जावून केवायसी प्रक्रिया करुन घ्यावी असे आवाहन मुंब्रा येथील फ ४८ चे शिधावाटप अधिकारी रोहित माळकर यांनी केले. केवायसी न केल्यास शिधापत्रिका रद्द होईल असा गैरसमज नागरिकांमध्ये पसरल्याने त्याबाबत मुस्लीम लीगच्या शिष्टमंडळाने शिधावाटप अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी केवायसी न झाल्यास रेशन कार्ड बंद होणार नाही अशी ग्वाही मुस्लिम लीगच्या शिष्टमंडळाला दिली. नागरिकांना कोणतेही हमीपत्र भरुन देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  मुंब्रा कौसा परिसरातील काही शिधावाटप दुकानांमध्ये नागरिकांना कमी प्रमाणात धान्य मिळत असल्याच्या तक्रारी मुस्लीम लीगच्या विद्यार्थी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा फरहत शेख यांनी माळकर यांच्यासमोर मांडल्या त्याव

जेएन- 1’ घातक नाही; नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी - आरोग्य मंत्री

  जेएन- 1 ’  घातक नाही ;  नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी -  आरोग्य मंत्री                मुंबई  : राज्यात कोरोनाच्या  ‘ जेएन-1 ’  या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने  ' कोरोना टास्क फोर्स '’  स्थापन करण्यात आले असून या टास्क फोर्सची पहिली बैठक आज (गुरुवार) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. कोरोनाचा  ‘ जेएन-1 ’  हा नवीन  उपप्रकार घातक नसला तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे पालन करावे ,  असे आवाहन मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले आहे.                 ‘ जेएन-१ ’  या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा  ' कोरोना टास्क फोर्स '’  स्थापन करण्यात आले आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली या टास्क फोर्सची बैठक आज झाली.                 आरोग्य विभागाचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरो

देशातील लोकशाहीचे अस्तित्व संपवण्याचा कट- मर्जिया पठाण यांचा आरोप, 146 खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंब्य्रात जोरदार निदर्शने

इमेज
देशातील लोकशाहीचे अस्तित्व संपवण्याचा कट- मर्जिया पठाण यांचा आरोप,  146 खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंब्य्रात जोरदार निदर्शने  मुंब्रा : - देशात हुकूमशाहीचा उदय होत असून त्यातूनच 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे, असा आरोप करीत मुंब्रा येथे मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली.  संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार्या विरोधी पक्षाच्या खासदारांना सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून निलंबित करण्यात आले आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेकडो महिला , पुरूष, लहान मुले सहभागी झाले होते. यावेळेस आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.    पठाण म्हणाल्या की, संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणे हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे. मात्र, ही सुरक्षा न पाळल्यामुळेच काही तरूण सभागृहात शिरले. त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी पत्करलेला मार्ग योग्य आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, त्

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही

इमेज
मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण,   गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार,  शरद कुळकर्णींची ग्वाही  खलील गिरकर - मोंड  मोंड येथील शांताराम विष्णू कुळकर्णी माध्यमिक शाळेच्या प्रांगणात मोंड ग्रामस्थ विकास मंडळ मुंबईतर्फे बांधण्यात आलेल्या कै.  श्रीमती शिल्पा मोहन गोरे रंगमंच  व शाळा परिसराच्या नुतनीकरणाचा उद्घाटन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.   मोंड पंचक्रोशीतील आबालवृध्दांनी या मंगलसोहळ्याला मोठी गर्दी केली होती. मंडळाचे अध्यक्ष शरद कुळकर्णी व मुंबईच्या कार्यकारिणी सदस्यांनी यासाठी खास उपस्थिती लावली.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद कुळकर्णी होते.  यावेळी बापू मुणगेकर, मंगेश माणगावकर,शामसुंदर मुणगेकर, प्रकाश अनभवणे, गोविंद  झरकर, शरद घाडी, संजय देवरुखरकर, लवू मोंडे,  गणेश राणे, आसावरी कदम, प्रदीप कोयंडे, अभय बापट, प्रसाद कुळकर्णी, शामल अनभवणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  उपाध्यक्ष सुभाष अनभवणे यांनी केले.   अभय बापट यांनी आभार प्रदर्शन केले.  उप सचिव शरद घाडी यांनी गावच्य

सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता - राधाकृष्ण विखे पाटील, खंडकरी शेतकरी व सिलिंग जमीनी मिळालेल्या भूमीहीन, माजी सैनिक,दुर्बल घटकांना मिळणार लाभ

  सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता - राधाकृष्ण विखे पाटील,   खंडकरी शेतकरी व सिलिंग जमीनी मिळालेल्या भूमीहीन, माजी सैनिक,दुर्बल घटकांना मिळणार लाभ लोकमानस प्रतिनिधी नागपूर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिलिंग कायद्यात सुधारणा करण्यास विधिमंडळाची मान्यता आज मिळाली आहे. आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग-2 म्हणुन वाटप केलेल्या जमिनींचा भोगवटा वर्ग-1 करणे शक्य होणार आहे. यामुळे खंडकरी शेतकरी व सिलिंग जमीनी मिळालेल्या भूमीहीन, माजी सैनिक, दुर्बल घटकांना लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.`          नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळामध्ये चर्चा होऊन सिलींग कायद्यातील सुधारणेला मान्यता देण्यात आलेली आहे. सिलींग कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनींना वर्ग-1 चा दर्जा मिळणार आहे. त्याचप्रमाणे माजी सैनिक, भूमिहिन, दुर्बल घटक यांना वाटप केलेल्या सिलींग जमिनी वर्ग-1 करण्यास पात्र ठरणार आहे. सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायतींकरीता शेती महामंडळाची जमीन उपलब्ध होणार

रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नावर रामदास आठवले यांनी घेतली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट

इमेज
रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नावर   रामदास आठवले यांनी घेतली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई - महाराष्ट्रातील रेल्वेस्थानके आणि रेल्वेरुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर आज  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपड्यांवर  निष्कासन  कार्यवाही तातडीने थांबवण्याची मागणी आठवले यांनी केली. तसेच रेल्वेरुळालगत ज्या झोपडपट्ट्या आहेत सर्व  40 वर्षा हुन अधिक काळापासून वसलेल्या आहेत अशा झोपडपट्ट्यांचे  निष्कासन तातडीने थांबवले पाहिजे. अधिकृत झोपडपट्टीवासीयांचे रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने  अधिकृत पुर्नवसन केले पाहिजे. पर्यायी घर देऊन रेल्वेरुळांलगतच्या झोपडपट्टीवासीयांचे पुर्नवसन केल्यानंतरच रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्याच्या निष्कासनचा  विचार करावा अशी आग्रही मागणी ना.रामदास आठवले यांनी केंद्रिय रेल्वे मंत्री मा.अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.यावेळी झालेल्या चर्चत

२३ वा पार्ले महोत्सव २३ डिसेंबर पासून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन, सुमारे ३० हजार स्पर्धक सहभागी होणार

२३ वा पार्ले महोत्सव २३ डिसेंबर पासून,   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,  सुमारे ३० हजार स्पर्धक सहभागी होणार लोकमानस प्रतिनिधी मुंबई  : मागील अनेक वर्षांपासून आयोजित होत असलेला मुंबईतील सर्वात मोठा महोत्सव म्हणजे ‘पार्ले महोत्सव’  २३ डिसेंबर पासून सुरु होत आहे. यंदाच्या २३ व्या पार्ले महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व खासदार पूनम महाजन विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. सदर माहिती महोत्सवाचे प्रमुख आयोजक व विले पार्ल्याचे आमदार पराग अळवणी यांनी दिली. दरवर्षी प्रमाणे यंदाही पार्ले महोत्सवाचे स्वरूप हे विविध स्पर्धांचे आयोजन असे असून, एकूण ३२ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतील. यातील विविध वयोगट धरून सुमारे ३९२ प्रथम पारितोषिकांसह एकूण २५०० पारितोषिके बहाल करण्यात येतील.  २३ ते ३० डिसेंबर रोजी चालणारा हा महोत्सव विलेपार्ले मधील वामन मंगेश दुभाषी मैदान, पार्ले टिळक विद्यालय व साठ्ये महाविद्यालय तसेच सहार गाव मैदान अशा विविध ठिकाणी संपन्न होईल. सातत्याने २३ वर्ष आयोजित हो

पदवीधर मतदारसंघासाठी दरवेळी नावनोंदणी करण्याची पध्दत रद्द करा, माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांची मागणी

इमेज
पदवीधर मतदारसंघासाठी दरवेळी नव्याने नावनोंदणीची अट जाचक, दर निवडणुकीला नोंदणी करण्याची पध्दत रद्द करा,  माजी उपमहापौर राजेंद्र साप्ते यांची मागणी   मुंब्रा - पदवीधर मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यासाठी दर निवडणुकीत स्वतंत्रपणे मतदारांना संपूर्ण प्रक्रियेचे पालन करुन नाव नोंदवावे लागते. सर्वसाधारण निवडणुकीसाठी एकदा मतदारनोंदणी केल्यावर ते नाव कायमस्वरुपी राहते मात्र पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीसाठी दर निवडणुकीला नावनोंदणी का करावी लागते, असा प्रश्न ठाण्याचे माजी उपमहापौर तथा शिवसेनेचे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख राजेंद्र साप्ते यांनी उपस्थित केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाने विचार करावा व या पध्दतीचा पुनर्विचार करावा अशी मागणी साप्ते यांनी केली आहे.  सध्या कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीची लगबग सुरु आहे. विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते पदवीधरांना या मतदारसंघात मतदार नोंदणी करण्यासाठी आवाहन करत आहेत. इच्छुक पदवीधर मतदारांना आपले नाव नोंदवण्यासाठी यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेचे पालन करावे लागत आहे. पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी प्रथमतः मतद

डॉ. असदुल्ला खान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक खेळ उत्सव संपन्न

इमेज
डॉ. असदुल्ला खान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात  वार्षिक खेळ उत्सव संपन्न  मुंब्रा : डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय वार्षिक खेळ उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.    मौलाना अबुलकलाम आझाद स्टेडियममध्ये या खेळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा व  कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुस्कान,  एजाज अंसारी और फरहान बामनी यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते.   कार्यक्रमाच्या प्रारंभी शांती व एकतेचे  प्रतिक असलेल्या कबूतरांना हवेत सोडण्यात आले.  शाळेच्या बँड पथकाने तय्यब सरांच्या मार्गदर्शनाखाली आपली कला  सादर केली. विविध खेळांच्या स्पर्धांचे संचलन पर्यवेक्षिका रिझवाना, आलिया व आबिदा यांनी केले.  संपूर्ण खेळ उत्सवाचे डॉ. असदुल्ला खान स्कूल, सोलापुरचे विश्वस्त, मुख्याध्यापक सादुल्ला खान यांनी व्यवस्थापन केले.   शीळ येथील शाळेचे मुख्याध्यापक इबादुल्ला खान,  जियाउल्लाह खान व संस्थापक डॉ असदुल्ला खान यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे,  पार

यंत्रमागधारक धारकांच्या समस्यांसाठी मंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, आमदार रईस शेख यांचा समावेश

यंत्रमागधारक धारकांच्या समस्यांसाठी  मंत्री दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन, आमदार रईस शेख यांचा समावेश -३० दिवसांमध्ये समिती उपाययोजनांचा अहवाल सादर करणार  लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  राज्यातील यंत्रमागधारकांच्या विविध अडचणी संदर्भात  उपायोजना सुचवण्यासाठी पणन, सहकार व वस्त्रोद्योग विभागाने मंगळवारी (ता.१९) लोकप्रतिनिधींची समिती गठीत केली. त्या समितीमध्ये समाजवादी पक्षाचे भिवंडीचे आमदार रईस शेख यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.   नागपूर येथे चालू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आमदार रईस शेख यांनी विधानसभेमध्ये राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्या संदर्भात १०५ अन्वये लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यंत्रमागधारकांच्या समस्यांवर  उपाययोजना सुचविण्यासाठी तज्ञांची समिती गठीत करण्याचे आणि त्यामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रातील अभ्यास असलेले आमदार रईस शेख यांना सदस्यपदी घेण्याबाबत आश्वासित केले होते.   बुधवारी तातडीने त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून मंत्री दादा भुसे समितीच्या अध्यक्षपदी आहेत. मह

मुंब्रा कब्रस्तानची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, निधी कमी पडू देणार नाही - नजीब मुल्लांची ग्वाही

मुंब्रा कब्रस्तानची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, निधी कमी पडू देणार नाही -  नजीब मुल्लांची ग्वाही मुंब्रा : मुंब्रा येथील कब्रस्तानची सर्व प्रलंबित कामे युध्दपातळीवर व दर्जेदारपणे पूर्ण केली जातील,  त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी दिली.   मुल्ला यांनी कब्रस्तानला भेट देऊन पाहणी केली.  यावेळी त्यांच्यासोबत अजीज शेख (बाटा),  राजू अन्सारी उपस्थित होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करुन घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.  कब्रस्तानमध्ये माती टाकण्याबाबत यापूर्वी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. पूर्वी तीन फूट भराव टाकण्यात आला होता, त्यामुळे कामात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. नागरिकांकडून तक्रारी येत होत्या.  मात्र यापुढील कामात आपण स्वत: लक्ष घालत असून आता साडेसहा फूट माती भरणा केली जाईल,  त्यामुळे तक्रारीला कोणतीही जागा राहणार नाही. महापालिका आयुक्तांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून येत्या काही दिवसा

भारत सरकार मिशन नवचेतना व्यसनमुक्ती‌ कार्यक्रमाचा महाराष्ट्रात प्रचार व‌ प्रसार : अॅड राजाराम दळवी

इमेज
भारत सरकार मिशन नवचेतना व्यसनमुक्ती‌ कार्यक्रमाचा महाराष्ट्रात प्रचार व‌ प्रसार : अॅड राजाराम दळवी लोकमानस प्रतिनिधी मुंबई-   नवचेतना प्रकल्प हा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय यांच्यातील एक सहयोगी उपक्रम आहे. नवचेतना हे आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले सार्वजनिक आरोग्य आणि औषध शिक्षण तज्ञ गॅरी रीड आणि जीवन कौशल्य तज्ञ आणि प्रशिक्षक कल्याणी व्ही यांनी लिहिले आहे. प्रायोगिक टप्प्यानंतर, उत्तर प्रदेश, पंजाब, चंदीगड आणि हरियाणा येथील "मास्टर ट्रेनर" च्या प्रशिक्षणासह, कार्यक्रमाची नवी दिल्ली येथे फील्ड चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थी, वैद्यकीय डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक आणि विशेष शिक्षक होते.  सामाजिक न्याय मंत्रालयाच्या कार्यकर्त्या आणि सल्लागार, प्रशिक्षक आणि इतर व्यावसायिकांसह संबंधित एजन्सींनी दिलेले समर्थन हे प्रकल्पाच्या रोल-आउटचे यश असेल. एक विश्वासू सेलिब्रिटी सल्लागार अॅड राजाराम दळवी यांनी रोटरी इंटरनॅशनल, रोटरी क्लब घाटकोपर, रोटरी क्लब ऑफ अॅडिक्शन प्रिव्हेन्शन, , मुक्ता चॅरिटेबल ट्रस्टच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि एक प्रति

शालेय पोषण आहारात प्रति अंड्यासाठी 7 रूपये द्या, - कमलताई परुळेकर यांची मागणी

  शालेय पोषण आहारात प्रति अंड्यासाठी 7 रूपये द्या,  -  कमलताई परुळेकर यांची मागणी  लोकमानस प्रतिनिधी -   शासनाने प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना म्हणजेच पूर्वीची शालेय पोषण आहार योजना नाविन्यपूर्ण बनवावी असे केंद्रीय आदेश आल्यामुळेच शालेय शिक्षण विभागाने 7 नोव्हेबरला एक शासन आदेश काढला व यापुढे 23 आठवडे नियमित आहारा व्यतिरिक्त 1 ली ते 8 वीच्या शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा उकडलेले अंडे द्यावे व न खाणार्‍या  विद्यार्थ्यांना केळे द्यावे, असा आदेश काढला.  अंडी  7 रूपयाला एक या दराने मिळते  व केळी 50 रुपये डझन या दराने मिळतात. म्हणजे एक केळे 4 रुपये 20 पैशाला पडणार.ते बाजारातून आणणे वगैरे खर्च आहेच.  परंतू, ते एक वेळ परवडू शकेल मात्र अंड्याचा खर्च पाच रुपयात होणे अशक्य आहे.  बाजारात जाणे,चांगली अंडी मिळवणे, ती उकडण्याचा खर्च आणि मजुरी हे सर्व 5 रूपयात होत नाही हे सरकारला कळत नाही का? असा प्रश्न शालेय पोषण आहार संघाच्या अध्यक्षा कमलताई परुळेकर व उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत  यांनी उपस्थित केला आहे.  पहिल्या टप्प्यात एक महिन्याचा अंडी केली खर्च शाळांना अग्रीम दिला जाईल असे जी आर म

पालिका शाळांचे भगवेकरण थांबवा- आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी -धर्माच्या आधारावर विद्यार्थी स्पर्धांना शेख यांनी केला ठाम विरोध

पालिका शाळांचे भगवेकरण थांबवा-  आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी                      -धर्माच्या आधारावर विद्यार्थी स्पर्धांना  शेख यांनी केला ठाम विरोध   मुंबई प्रतिनिधी -  मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये ‘प्रभू श्रीराम’ विषयांवर निबंध, चित्रकला व कवितालेखन स्पर्धा आयोजित करण्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पालिका प्रशासनाला दिलेल्या निर्देशांना समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी’चे आमदार रईस शेख यांनी ठाम विरोध केला आहे. आमदार शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रविवारी पत्र दिले असून मुंबई महापालिका शाळांचे भगवीकरण रोखण्याबाबत हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.   राज्याचे कौशल्‍य, रोजगार, उद्योजगता व नावन्‍यिता मंत्री  मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्‍त  इक्बाल सिंह चहल यांना दि. १५/१२/२०२३ रोजी  पालकमंत्री  या अधिकारात  पत्र पाठवले आहे. ‘प्रभू रामाची २२ जानेवारी २०२४ रोजी अयोद्ध्येत प्रतिष्ठापना होत असून त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून पालिका शाळामध्ये ‘प्रभू श्रीराम’ विषयांवर निबंध, चित्रकला व कवितालेखन स्पर्धा आयोजित करावी

इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड मारुती किसन विश्वासराव यांना जाहीर

इमेज
इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड मारुती किसन विश्वासराव यांना जाहीर  मुंबई -   मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख,  पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व सामाजिक कार्यकर्ते मारुती विश्वासराव यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकार दिनाच्या निमित्ताने या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी ०७ जानेवारी २०२४ रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मेळावा व आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास संपूर्ण देशातील तसेच परदेशातील पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत. या  कार्यक्रमात मारुती किसन विश्वासराव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना इंटरन

लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून साधला संवाद, लोकायुक्त विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारेंनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार

लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून साधला संवाद,  लोकायुक्त विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारेंनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आभार नागपूर :- लोकायुक्त विधेयक विधान परिषदेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्याना ही बातमी दिली. यावेळी हे विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.  युपीए 2 सरकारच्या कार्यकाळात देशभरात  भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे एकामागून एक समोर यायला लागल्याने त्याना आळा घालण्यासाठी जनलोकपाल विधेयक मंजूर करण्याची मागणी पुढे आली.  हे विधेयक संसदेत मांडून ते पारित करावे या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आमरण उपोषण केले. अण्णांचे आंदोलन अल्पावधीतच लोकांनी उचलून धरल्याने त्याचे जनआंदोलनात रूपांतर झाले. अखेर जनतेच्या रेट्यामुळे 2014 साली युपीए -2 सरकार कोसळले.  केंद्रात लोकपाल प्रमाणेच राज्यातही लोकायुक्त विधेयक मंजूर करण्याची आग्रही मागणी

मुंब्रा कौसामधील वाहतूक नियमनासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्तांचा पुढाकार

इमेज
मुंब्रा कौसामधील वाहतूक नियमनासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्तांचा पुढाकार मुंब्रा :   मुंब्रा कौसा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना आखून ठोस उपाययोजना करण्यासाठी व सध्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांच्या सहाय्यक आयुक्त कवयित्री गावित स्वत: रस्त्यावर उतरल्या आहेत.  रेतीबंदर ते कल्याण फाटा या मार्गाची त्या दोन दिवसांपासून पाहणी करत आहेत. शनिवारी त्यांनी कौसा येथील तलावपाळी पर्यंत पाहणी केली. या मार्गावर कोणते रस्ते जोडलेले आहेत,  कोणत्या ठिकाणी पार्किंग देता येईल, नेहमी वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे आदींची त्यांनी पाहणी केली.   मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या गाड्या,  बेवारस वाहने आदींना नोटिस देण्यात येत आहे. दुचाकी पार्किंग साठी जागा निश्चिती केली जात आहे. रेल्वे स्थानक, अमृत नगर, संजय नगर,  कौसा या ठिकाणी वाहतूक चौकी उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल,  सध्या दोन क्रेन व चाळीस जँमर च्या सहाय्याने

जुन्या पेन्शनसाठीचे अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी 'सामुहिक रजा' आंदोलन यशस्वी, समयमर्यादेत निर्णय न झाल्यास उग्र आंदोलनाचा निर्धार

जुन्या पेन्शनसाठीचे अधिकाऱ्यांचे राज्यव्यापी 'सामुहिक रजा' आंदोलन यशस्वी,  समयमर्यादेत निर्णय न झाल्यास उग्र आंदोलनाचा निर्धार लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यासंदर्भात शासनाला सादर झालेल्या अहवालास मंजूरी व अंमलबजावणी करण्यास होत असलेल्या अवाजवी शासन दिरंगाईमुळे, सर्व अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना पसरली असून, त्या अनुषंगाने गुुुरुवारी  अधिकाऱ्यांचे लाक्षणिक राज्यव्यापी 'सामुहिक रजा' आंदोलन झाले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, बुधवारी  नागपूर येथे  मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही उपमुख्यमंत्री  तसेच शिक्षक व पदवीधर मतदार संघांचे विधानपरिषद सदस्य; राजपत्रित अधिकारी महासंघ, सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत, जुनी पेन्शन योजना व इतर महत्त्वाच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाकडून ठोस लेखी आश्वासन न मिळाल्यामुळे, अधिकारी महासंघाने एक दिवसाच्या राज्यव्यापी सामुहिक रजा आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला होता. त्यास अनुषंगून, अधिकारी महासंघाच्या आवाहनानुसार, अधिकाऱ्यांनी सक्रीय सहभाग घेऊन आज

समाज सेविका हनिफा पाल यांची विविध पदांवर नियुक्ती

इमेज
समाज सेविका हनिफा पाल यांची विविध पदांवर नियुक्ती माणगांव (प्रतिनिधी) – माणगांव तालुक्यातील हरकोल येथील राहणाऱ्या हनिफा शुऐब पाल या शिक्षिकेला समाजाच्या प्रति असणाऱ्या बांधिलकीतून समाजसेवा करण्यांचा छंद व आवड निर्माण झाली आहे. त्यांनी खिदमते खलक या नावाने एक मिशन सुरू केले आहे. या मिशन मार्फत दिव्यांग व विधवा महिलांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे व विविध शासकीय निधी मिळवून देण्याचे कार्य त्या गेली ४ महिन्यापासून सक्षमपणे करीत आहेत. त्यांची या समाज सेवेची आवड पाहून त्यांची निवड भारतीय मानव अधिकार माणगांव तालुका अध्यक्ष तर अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य रायगड जिल्हा महिला सचिव पदी निवड करण्यात आली आहे. तसेच महाड, पोलादपूर तालुक्यातील कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी हनिफा पाल यांचे वर माणगांव तालुका शिवसेना महिला आघाडी शाखा प्रमुख तर शिवसेना मुस्लिम संघटना माणगांव तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. हनिफा पाल यांच्यावर विविध संघटनांच्या पदाचा वर्षाव झाला आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन मान्यवरांकडून केली जात आहे. तसेच विवि

सामूहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडप्यांचे लग्न, विधवा व घटस्फोटितांचा देखील समावेश

सामूहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडप्यांचे लग्न,   विधवा व घटस्फोटितांचा देखील समावेश  मुंब्रा -  मुंब्रा मध्ये झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले. यामध्ये तीन जणी विधवा तर पाच जणी घटस्फोटित होते. यस वी कॅन व सागर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते.  नवपरिणीत जोडप्याला आयोजकांतर्फे पलंग, कपडे, सोन्याची अंगठी, भांडी व इतर गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या गेल्या. मुफ्ती साजीदुर रहमान यांनी या सोहळ्यात निकाह लावले. हा सामूहिक विवाह सोहळा सर्वांसाठी खुला असल्याची माहिती देण्यात आली.   यस वी कॅनचे अध्यक्ष डॉ रमीझ राजा, अँड कबीर चौधरी, सागर चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख गयासुद्दीन खान, जमाल खान यांच्यासहित अनेकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला.  ------------------

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे १ वर्ष ५ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य वाटप, १९,००० हुन अधिक रुग्णांचे वाचले प्राण

  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे १ वर्ष ५ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य वाटप, १९,००० हुन अधिक रुग्णांचे वाचले प्राण प्रतिनिधी -  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना अक्षरशः जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिले आहेत.  यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १७ महिन्यात १९,००० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्

एमपीएल क्रिकेट स्पर्धेत एस.के.व्हॅली ठरला विजेता, इन टायटन ठरला उपविजेता

एमपीएल क्रिकेट स्पर्धेत एस.के.व्हॅली ठरला विजेता, इन टायटन ठरला उपविजेता    मुंब्रा -   राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि मुंब्रा कौसा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ (भाई साहब) यांच्या नेतृत्वात  मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम, एमएम व्हॅली, कौसा येथे आयोजित मुंब्रा प्रीमियर लीग (एमपीएल) सीझन 11 चा शहरातील क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्तपणे आनंद लुटला.   तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राष्ट्रवादीचे नेते व स्थानिक आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी येथे पोहोचून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.या स्पर्धेत सुमारे 16 संघातील 208 खेळाडूंनी सहभाग घेतला.अंतिम सामन्याचे नाणेफेक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अशरफ आणि कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांनी केले. यानंतर अत्यंत रोमांचक सामन्यात  टायटन्सचा पराभव करत एस.  के.व्हॅली संघाने बाजी मारून 3 लाख 33 हजार 333 रुपये रोख व करंडक पटकावला तर 2 लाख 22 हजार 222 रुपयांचे द्वितीय पारितोषिक व चषकावर टायटन संघाला समाधान मानावे लागले.   याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला “मॅन ऑफ द सिरीज” असे अनेक पुरस्कार देण्यात आले. यावेळी गृ

ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे

इमेज
ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे  मुंब्रा - ठाणे पोलिस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डुंबरे सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत होते.  विद्यमान पोलिस आयुक्त जय जीत सिंह यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे.  डुंबरे यांनी यापूर्वी ठाणे पोलिस आयुक्तालयात सह पोलिस आयुक्त पदी काम केले आहे.  त्यानंतर ते मुंबई पोलिस आयुक्तालयात सह आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा व सह आयुक्त गुन्हे या पदांवर कामाचा ठसा उमटवला आहे.  आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिस अधिक कार्यक्षम होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

राष्ट्रीय लोक अदालतीत 88 पॅनल द्वारे 6615 प्रलंबित प्रकरणे व 3862 दाखल पूर्व प्रकरणे निकाली, निकाली प्रकरणांचे मूल्य 513 कोटी 25 लाख रुपये

राष्ट्रीय लोक अदालतीत 88 पॅनल द्वारे 6615 प्रलंबित प्रकरणे व 3862 दाखल पूर्व प्रकरणे निकाली,   निकाली प्रकरणांचे मूल्य 513 कोटी 25 लाख रुपये   मुंबई - प्रतिनिधी मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश तथा मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष अनिल सुब्रम्हण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली  नगर दिवाणी व सत्र न्यायालय, महानगरदंडाधिकारी  न्यायालय, राज्य ग्राहक आयोग, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी,  एमएसीटी मुंबई येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते. सदर लोक न्यायालयात 88 पॅनल नेमण्यात आली होती. त्यामध्ये 6615 प्रलंबित प्रकरणे व 3862 दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य 513 कोटी 25 लाख रुपये आहे.   मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 4 ते 8 डिसेंबर या काळात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी येथील न्यायालयात एकूण 7 हजार 431 प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली.    लोक न्यायालयाच्या कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी  प्रधान न्यायाधीश  अनिल सुब्रम्हण्यम, नगर दिवाणी व सत्र न्यायालय वकील संघाच

ठाण्यातील चित्रकार आशिष इरप यांच्या चित्राला व्हेनिस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार

इमेज
ठाण्यातील चित्रकार आशिष इरप यांच्या चित्राला व्हेनिस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार लोकमानस प्रतिनिधी - ठाण्यातील चित्रकार आशिष इरप यांच्या चित्राला इटलीमधील व्हेनिस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला आहे. या फेस्टिव्हल मध्ये त्यांना एक्सलन्स अवार्डने सन्मानित करण्यात आले. इरप यांच्या वेट वाईब्स या कलाकृतीला निमंत्रित करुन एक्सलेन्स अवार्डने गौरवण्यात आले. हा फेस्टिव्हल अत्यंत प्रतिष्ठीत असून जगभरातून १२०० पेक्षा अधिक कलाकार व चित्रकारांच्या कलाकृतींच्या एन्ट्री आल्या होत्या. त्यामधून लॅंडस्केप निसर्गचित्र या विभागातून आशिष इरप यांच्या कलाकृतीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई सीएसटी परिसरातील प्रवासी वातावरणाचे दृश्य साकारले आहे, त्यामध्ये अत्यंत सुंदर अशी प्रकाश योजना, मनमोहक रंगसंगती यामुळे चित्र अतिशय सुंदर झाले आहे.  हे चित्र पाहताना आशिष यांचे वॉटरकलर या माध्यमावर असलेले त्यांचे प्रभुत्व सहजपणे दिसून येते. इरप यांच्या अनेक कलाकृतींना यापूर्वी अनेकदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सर्वंकष असा 'डायनॅमिक प्लॅटफॉर्म' तयार होणार - देवेंद्र फडणवीस

ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सर्वंकष असा 'डायनॅमिक प्लॅटफॉर्म' तयार होणार - देवेंद्र फडणवीस लोकमानस प्रतिनिधी  नागपूर : राज्यामध्ये ॲप, संकेतस्थळे, विविध समाजमाध्यम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये बरेचसे ॲप विदेशातून संचालित करण्यात येत आहे. अशा ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी सर्वंकष असा 'डायनॅमिक (गतिमान) प्लॅटफॉर्म' तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून जलद प्रतिसाद मिळण्याची व्यवस्था होणार आहे. ही सर्व व्यवस्था एका ॲपमध्ये असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत  उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, ए. एस. ट्रेडर्स व त्यांच्या अन्य कंपन्यांनी केलेल्या फसवणुकीबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये वेगवेगळ्या राज्यांशी समन्वय करून तपास सुरू आहे. गुंतवणुकीचा पैसा विदेशात गेला असल्यास आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वये अंमलबजावणी संचालनालयाची मदत घेण्यात येईल. या गुन्ह्यामध्ये पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर तपास पुढे जाईल त्यानुसार पुढील दोषारोप पत्राम

ओबीसी भटक्या विमुक्तांचा आरक्षण एल्गार महामेळावा ९ तारखेला इंदापूरला

ओबीसी भटक्या विमुक्तांचा आरक्षण एल्गार महामेळावा ९ तारखेला इंदापूरला होणा र लोकमानस प्रतिनिधी  मुंबई -  ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी "चलो इंदापूर" चा नारा देत  तमाम बारामती तालुक्यातील ओबीसी भटके विमुक्त समाज बांधव हजारोंच्या संख्येने इंदापूर कडे ९ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कुच करणार आहेत.  गेल्या सहा दिवसात यासाठी पुणे जिल्यातील गावागावात बैठका झाल्या आहेत. शेकडो गाड्यांचे ताफे इंदापूर कडे प्रयाण करणार आहेत. अनेक युवक व कार्यकर्ते  इंदापूरकडे कूच करणार आहेत अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून "पुणे जिल्हा ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचावो कृती समिती" च्या वतीने देण्यात आली.  या पत्रकार परिषदेला नवनाथ पडळकर ,अनिल लडकत, बापुराव सोलनकर, देवेंद्र बनकर, नाना मदने, गणेश काशीद,  प्रियदर्शनी कोकरे, ज्ञानेश्वर कौले, लक्ष्मण घोळवे बारामती येथे उपस्थित होते ओबीसी चे जेष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांना वारंवार टार्गेट करणे ,ओबीसीच्या आरक्षणाचे लचके तोडण्याचे प्रयत्न करणे, ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यांवर हल्ले करण्याच्या धमक्या देणे, राजकारणात ओबीसीचे जाणीवपूर्

सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सिंधुदुर्ग किल्ला भारतातील प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमानाची भावना निर्माण करतो – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकमानस प्रतिनिधी  सिंधुदुर्ग  : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग येथे आयोजित ‘नौदल दिन 2023’ च्या मुख्य कार्यक्रमाला उपस्थित होते. सिंधुदुर्ग येथील तारकर्ली समुद्रकिनारी भारतीय नौदलाची जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि विशेष दलांची ‘थरारक प्रात्यक्षिके ’ यांचे त्यांनी निरीक्षण केले. मोदी यांनीगार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची पाहणी केली.             यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, मालवण, तारकर्ली किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग हा भव्य किल्ला , वीर शिवाजी महाराजांचे वैभव आणि राजकोट किल्ल्यावरील त्यांच्या नेत्रदीपक पुतळ्याचे लोकार्पण आणि भारतीय नौदलाचा जयघोष आणि 4 डिसेंबर या ऐतिहासिक दिवसामुळे भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन उत्कटता आणि उत्साहाने भारावून गेले आहे.मोदी यांनी नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शूरवीरांपुढे नतमस्तक झाले. सिंधुदुर्गच्या विजयी भूमीवर नौदल दिन साजरा करणे हा खरोखरच अभूतपूर्व अभिमानाचा क्षण आहे असे पंतप्रधान म्हणा

बाळू दादांची पंच्याहत्तरी- डॉ. शरीफ गिरकर

इमेज
बाळू दादांची पंच्याहत्तरी -------- डॉ. शरीफ गिरकर  ९३७०८५०९६७,९४०४४४९५३९ ------- १ डिसेंबर, वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील पहिला दिवस. आज आमच्या बाळू दादांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस. पूर्ण नाव नारायण पुंडलिक अनभवणे, परंतु शाळेपर्यंत व काही सरकारी कामपर्यंतच ही नामावली मर्यादित राहिली. फक्त बाळू दादा  या नावानेच ते सर्वपरिचित आहेत. लहान थोरांचे बाळू दादा !  फार स्थूल नाही पण काटक बांधा ६ फुटापर्यंतची उंचपुरी शरीरयष्टी व तेवढाच करारी आवाज. आमचे बाळू दादा हे कोकणातल्या फणसाप्रमाणे गोड आहेत. बाहेरुन काटेरी पण आतुन मुलायम. अनोळखी माणसाला त्यांच्या आवाजाची भिती वाटते. जे बोलायचे ते रोखठोक व वरच्या पट्टीत, आम्हा सर्वांना त्यांच्या स्वभावाची सवय झाली आहे. पण अनोळखी माणसाला बाळू दादाची भिती वाटते, असो. माणूस मनाने श्रीमंत. भर जवानीत आमच्या बाळू दादांनी कष्टाची, मेहनतीची कामे भरपूर केली. चिऱ्यांची कामे करुन घरबांधणीमध्ये त्यांचा हातखंडा होता. दुर्दैवाने या काळात त्यांना दारुचे प्रचंड व्यसन जडले. २४ तास दारु, त्यामुळे कुटुंबाची हेळसांड होऊ लागली. अशाही परिस्थितीत त्यांच्या पत्नीने त्यां

मुंब्रा शंकर मंदिराजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे लोकार्पण

मुंब्रा शंकर मंदिराजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे लोकार्पण  मुंब्रा : मुंब्रा शहरातील शंकर मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.  आमदार जितेंद्र आव्हाड,  संघर्ष संस्थेच्या अध्यक्षा रुता आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले.  यावेळी ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते  अश्रफ शानु पठाण, माजी नगरसेविका सुनीता सातपुते, रुपाली गोटे, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा पल्लवी जगताप,बुध्दभूषण गोटे, प्रवीण पवार उपस्थित होते.  यावेळी आमदार आव्हाड म्हणाले, समाजमंदिराच्या माध्यमातून समाजहिताच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने समाजमंदिराची उभारणी करण्यात आली आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी निधीच्या अडचणीमुळे रखडलेले हे काम आता पूर्णत्वास गेल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. 

मुंब्रा कौसा मध्ये रंगणार एमपीएल क्रिकेट स्पर्धा,विजेत्या संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये तर उप विजेत्या संघाला मिळणार २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे बक्षिस

इमेज
मुंब्रा कौसा मध्ये रंगणार एमपीएल क्रिकेट स्पर्धा, विजेत्या संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये तर उप विजेत्या संघाला मिळणार २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे बक्षिस  मुंब्रा -  मुंब्रा कौसा येथील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना संधी मिळण्यासाठी व क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी मुंब्रा कौसा येथे मुंब्रा प्रीमीयम लिग (एमपीएल)) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ८ डिसेंबर ते १० डिसेंबर दरम्यान मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. विजेत्या संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये तर उप विजेत्या संघाला मिळणार २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे बक्षिस दिले जाईल. त्याशिवाय सामनावीर, मालिकावीर व इतर वैयक्तिक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.  या स्पर्धेचे आयोजक मुंब्रा कौसा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद अली अश्रफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शमीम खान, शब्बीर खान, आझिम शेख, एहतशाम खान, जावेद शेख, सादिक खान, इम्तियाज वणू व इतर पदाधिकारी उपस्थित होते.  या स्पर्धा आयोजित करण्यामागे मुंब्रा कौसा मध्ये खेळाला  प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. स्पर्धेचे यंदाचे 11 वे वर्ष आहे.  या स्