इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड मारुती किसन विश्वासराव यांना जाहीर

इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड मारुती किसन विश्वासराव यांना जाहीर 
मुंबई - 
 मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धीप्रमुख,  पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक व सामाजिक कार्यकर्ते मारुती विश्वासराव यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकार दिनाच्या निमित्ताने या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी ०७ जानेवारी २०२४ रोजी पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सकाळी १० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार मेळावा व आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पत्रकारिता तसेच इतर क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्या कर्तृत्ववान महिला व पुरुषांचा या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय एक्सलन्स पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास संपूर्ण देशातील
तसेच परदेशातील पुरस्कारार्थी उपस्थित राहणार आहेत. या  कार्यक्रमात मारुती किसन विश्वासराव यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास नागिरकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब