मुंब्रा कौसामधील वाहतूक नियमनासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्तांचा पुढाकार

मुंब्रा कौसामधील वाहतूक नियमनासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी, वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्तांचा पुढाकार

मुंब्रा : 
 मुंब्रा कौसा शहरातून जाणाऱ्या जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना आखून ठोस उपाययोजना करण्यासाठी व सध्या भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांच्या सहाय्यक आयुक्त कवयित्री गावित स्वत: रस्त्यावर उतरल्या आहेत.  रेतीबंदर ते कल्याण फाटा या मार्गाची त्या दोन दिवसांपासून पाहणी करत आहेत. शनिवारी त्यांनी कौसा येथील तलावपाळी पर्यंत पाहणी केली. या मार्गावर कोणते रस्ते जोडलेले आहेत,  कोणत्या ठिकाणी पार्किंग देता येईल, नेहमी वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे आदींची त्यांनी पाहणी केली.  
मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यावर पार्क करण्यात आलेल्या गाड्या,  बेवारस वाहने आदींना नोटिस देण्यात येत आहे. दुचाकी पार्किंग साठी जागा निश्चिती केली जात आहे. रेल्वे स्थानक, अमृत नगर, संजय नगर,  कौसा या ठिकाणी वाहतूक चौकी उभारण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल,  सध्या दोन क्रेन व चाळीस जँमर च्या सहाय्याने कारवाई केली जात आहे,  असे त्यांनी स्पष्ट केले. 
या पायी पाहणी दौऱ्यात सहाय्यक आयुक्त गावित यांच्यासोबत मुंब्रा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक सुरेश खेडेकर व इतर अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.  वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ विनय कुमार राठोड, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गावरील वाहतूक कोंडी कायमस्वरुपी सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती गावित यांनी दिली. 
वाहतूक नियमनाबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही