मुंब्रा शंकर मंदिराजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे लोकार्पण

मुंब्रा शंकर मंदिराजवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे लोकार्पण 
मुंब्रा : मुंब्रा शहरातील शंकर मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.  आमदार जितेंद्र आव्हाड,  संघर्ष संस्थेच्या अध्यक्षा रुता आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते 
अश्रफ शानु पठाण, माजी नगरसेविका सुनीता सातपुते, रुपाली गोटे, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा पल्लवी जगताप,बुध्दभूषण गोटे, प्रवीण पवार उपस्थित होते. 
यावेळी आमदार आव्हाड म्हणाले, समाजमंदिराच्या माध्यमातून समाजहिताच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने समाजमंदिराची उभारणी करण्यात आली आहे, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी निधीच्या अडचणीमुळे रखडलेले हे काम आता पूर्णत्वास गेल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब