डॉ. असदुल्ला खान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक खेळ उत्सव संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात  वार्षिक खेळ उत्सव संपन्न 
मुंब्रा : डॉ. असदुल्लाह खान इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दोन दिवसीय वार्षिक खेळ उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  
 मौलाना अबुलकलाम आझाद स्टेडियममध्ये या
खेळ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा व  कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी यामध्ये सहभाग घेतला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुस्कान,  एजाज अंसारी और फरहान बामनी यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते.  

कार्यक्रमाच्या प्रारंभी शांती व एकतेचे  प्रतिक असलेल्या कबूतरांना हवेत सोडण्यात आले. 
शाळेच्या बँड पथकाने तय्यब सरांच्या मार्गदर्शनाखाली आपली कला  सादर केली. विविध खेळांच्या स्पर्धांचे संचलन पर्यवेक्षिका रिझवाना, आलिया व आबिदा यांनी केले.  संपूर्ण खेळ उत्सवाचे डॉ. असदुल्ला खान स्कूल, सोलापुरचे विश्वस्त, मुख्याध्यापक सादुल्ला खान यांनी व्यवस्थापन केले.  
शीळ येथील शाळेचे मुख्याध्यापक इबादुल्ला खान,  जियाउल्लाह खान व संस्थापक डॉ असदुल्ला खान यांच्या हस्ते विजेत्यांना प्रमाणपत्रे,  पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब