राष्ट्रीय लोक अदालतीत 88 पॅनल द्वारे 6615 प्रलंबित प्रकरणे व 3862 दाखल पूर्व प्रकरणे निकाली, निकाली प्रकरणांचे मूल्य 513 कोटी 25 लाख रुपये


राष्ट्रीय लोक अदालतीत 88 पॅनल द्वारे 6615 प्रलंबित प्रकरणे व 3862 दाखल पूर्व प्रकरणे निकाली,  निकाली प्रकरणांचे मूल्य 513 कोटी 25 लाख रुपये  
मुंबई - प्रतिनिधी
मुंबई नगर दिवाणी व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश तथा मुंबई जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चे अध्यक्ष अनिल सुब्रम्हण्यम यांच्या मार्गदर्शनाखाली  नगर दिवाणी व सत्र न्यायालय, महानगरदंडाधिकारी  न्यायालय, राज्य ग्राहक आयोग, सहकारी अपिलीय न्यायालय, डीआरटी,  एमएसीटी मुंबई येथे राष्ट्रीय लोक अदालत चे आयोजन करण्यात आले होते. सदर लोक न्यायालयात 88 पॅनल नेमण्यात आली होती. त्यामध्ये 6615 प्रलंबित प्रकरणे व 3862 दाखल पूर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. या सर्व निकाली प्रकरणाचे एकूण मूल्य 513 कोटी 25 लाख रुपये आहे. 

 मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे दिनांक 4 ते 8 डिसेंबर या काळात राबविण्यात आलेल्या विशेष अभियानात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी येथील न्यायालयात एकूण 7 हजार 431 प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली.  

 लोक न्यायालयाच्या कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी  प्रधान न्यायाधीश  अनिल सुब्रम्हण्यम, नगर दिवाणी व सत्र न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष अँड. रवी जाधव, पक्षकार व विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्या हस्ते झाडांना जल अर्पण करण्यात आले.  यावेळी  विधि महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 सदर लोक अदालत यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायालयातील न्यायिक अधिकारी, विधी सेवा प्राधिकरण चे सचिव अनंत देशमुख  व न्यायालयातील कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही