ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे

ठाण्याच्या पोलिस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे 
मुंब्रा - ठाणे पोलिस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डुंबरे सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी कार्यरत होते.  विद्यमान पोलिस आयुक्त जय जीत सिंह यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे. 
डुंबरे यांनी यापूर्वी ठाणे पोलिस आयुक्तालयात सह पोलिस आयुक्त पदी काम केले आहे.  त्यानंतर ते मुंबई पोलिस आयुक्तालयात सह आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा व सह आयुक्त
गुन्हे या पदांवर कामाचा ठसा उमटवला आहे. 
आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पोलिस अधिक कार्यक्षम होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही