ओबीसी भटक्या विमुक्तांचा आरक्षण एल्गार महामेळावा ९ तारखेला इंदापूरला

ओबीसी भटक्या विमुक्तांचा आरक्षण एल्गार महामेळावा ९ तारखेला इंदापूरला होणा
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई - 
ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी "चलो इंदापूर" चा नारा देत  तमाम बारामती तालुक्यातील ओबीसी भटके विमुक्त समाज बांधव हजारोंच्या संख्येने इंदापूर कडे ९ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कुच करणार आहेत.  गेल्या सहा दिवसात यासाठी पुणे जिल्यातील गावागावात बैठका झाल्या आहेत. शेकडो गाड्यांचे ताफे इंदापूर कडे प्रयाण करणार आहेत. अनेक युवक व कार्यकर्ते  इंदापूरकडे कूच करणार आहेत अशी माहिती आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून "पुणे जिल्हा ओबीसी व्हीजेएनटी आरक्षण बचावो कृती समिती" च्या वतीने देण्यात आली. 
या पत्रकार परिषदेला नवनाथ पडळकर ,अनिल लडकत, बापुराव सोलनकर, देवेंद्र बनकर, नाना मदने, गणेश काशीद,  प्रियदर्शनी कोकरे, ज्ञानेश्वर कौले, लक्ष्मण घोळवे बारामती येथे उपस्थित होते

ओबीसी चे जेष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांना वारंवार टार्गेट करणे ,ओबीसीच्या आरक्षणाचे लचके तोडण्याचे प्रयत्न करणे, ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्यांवर हल्ले करण्याच्या धमक्या देणे, राजकारणात ओबीसीचे जाणीवपूर्वक खच्चीकरण करणे, ओबीसीच्या जातींना दाखले मिळण्यासाठी होणारे अडथळे, भटक्या विमुक्तांच्या समस्या, अलुतेदार बलुतेदार समाज घटकांना दडपणाखाली राहावं लागण अशा विविध प्रश्नांवर वाचा फोडणाऱ्या या यलगार महामेळाव्याला महाराष्ट्रातील ओबीसी चे नेते छगन भुजबळ प्रकाश अण्णा शेंडगे, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, टी पी मुंडे, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण गायकवाड, इत्यादी नेते उपस्थित राहणार असून त्यांच्या धडाडत्या तोफा ऐकण्यासाठी  मोठया संख्येने लोक जमतील, अशी माहिती ओबीसी नेते नवनाथ
 पडळकर यांनी दिली.  या सभेस पुणे ,सोलापूर, सातारा, अहमदनगर जिल्ह्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने येणार आहेत. ही सभा पश्चिम महाराष्ट्रातील प्रस्थापितांच्या साम्राज्याला खिंडार पाडणार यात शंका नाही अशी भूमिका   पडळकर यांनी मांडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही