एमपीएल क्रिकेट स्पर्धेत एस.के.व्हॅली ठरला विजेता, इन टायटन ठरला उपविजेता

एमपीएल क्रिकेट स्पर्धेत एस.के.व्हॅली ठरला विजेता, इन टायटन ठरला उपविजेता 
 मुंब्रा - 
 राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आणि मुंब्रा कौसा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ (भाई साहब) यांच्या नेतृत्वात  मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियम, एमएम व्हॅली, कौसा येथे आयोजित मुंब्रा प्रीमियर लीग (एमपीएल) सीझन 11 चा शहरातील क्रीडाप्रेमींनी उत्स्फूर्तपणे आनंद लुटला. 
 तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत राष्ट्रवादीचे नेते व स्थानिक आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी येथे पोहोचून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.या स्पर्धेत सुमारे 16 संघातील 208 खेळाडूंनी सहभाग घेतला.अंतिम सामन्याचे नाणेफेक राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अशरफ आणि कळवा मुंब्रा विधानसभा अध्यक्ष शमीम खान यांनी केले.
यानंतर अत्यंत रोमांचक सामन्यात  टायटन्सचा पराभव करत एस.  के.व्हॅली संघाने बाजी मारून 3 लाख 33 हजार 333 रुपये रोख व करंडक पटकावला तर 2 लाख 22 हजार 222 रुपयांचे द्वितीय पारितोषिक व चषकावर टायटन संघाला समाधान मानावे लागले.   याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाला “मॅन ऑफ द सिरीज” असे अनेक पुरस्कार देण्यात आले.
यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कळवा मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शमीम खान, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, फरीद नूरी, शब्बीर खान, अजीम शेख, एहतेशाम खान, माजी नगरसेवक जफर नोमानी, सामाजिक कार्यकर्ते परवेज खान, नासीर पठाण, जावेद शेख, सादिक शेख, इम्तियाज वणु आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही