देशातील लोकशाहीचे अस्तित्व संपवण्याचा कट- मर्जिया पठाण यांचा आरोप, 146 खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंब्य्रात जोरदार निदर्शने

देशातील लोकशाहीचे अस्तित्व संपवण्याचा कट- मर्जिया पठाण यांचा आरोप, 
146 खासदारांच्या निलंबनाविरोधात मुंब्य्रात जोरदार निदर्शने 
मुंब्रा : - देशात हुकूमशाहीचा उदय होत असून त्यातूनच 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे, असा आरोप करीत मुंब्रा येथे मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. 
संसदेच्या अधिवेशनादरम्यान नवीन संसदेत शिरून रंगीत वायू सोडण्याचा प्रकार घडला होता. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार्या विरोधी पक्षाच्या खासदारांना सत्ताधाऱ्यांच्या सूचनेवरून निलंबित करण्यात आले आहे. त्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेकडो महिला , पुरूष, लहान मुले सहभागी झाले होते. यावेळेस आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  
 पठाण म्हणाल्या की, संसदेच्या सुरक्षेची काळजी घेणे हे सत्ताधाऱ्यांचे काम आहे. मात्र, ही सुरक्षा न पाळल्यामुळेच काही तरूण सभागृहात शिरले. त्यांच्या मागण्या रास्त असल्या तरी त्यांनी पत्करलेला मार्ग योग्य आहे, असे म्हणता येणार नाही. परंतु, त्या बाबत प्रश्न विचारणाऱ्या खासदारांना निलंबित केले जात असेल तर ते लोकशाहीला पूरक नाही. या घटनेमुळे देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.निलंबित करण्यात आलेल्या खासदारांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अन्यथा आम्ही या पेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही मर्जिया पठाण यांनी दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही