ठाण्यातील चित्रकार आशिष इरप यांच्या चित्राला व्हेनिस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार

ठाण्यातील चित्रकार आशिष इरप यांच्या चित्राला व्हेनिस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार
लोकमानस प्रतिनिधी -
ठाण्यातील चित्रकार आशिष इरप यांच्या चित्राला इटलीमधील व्हेनिस आंतरराष्ट्रीय वॉटर कलर फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळाला आहे. या फेस्टिव्हल मध्ये त्यांना एक्सलन्स अवार्डने सन्मानित करण्यात आले. इरप यांच्या वेट वाईब्स या कलाकृतीला निमंत्रित करुन एक्सलेन्स अवार्डने गौरवण्यात आले.
हा फेस्टिव्हल अत्यंत प्रतिष्ठीत असून जगभरातून १२०० पेक्षा अधिक कलाकार व चित्रकारांच्या कलाकृतींच्या एन्ट्री आल्या होत्या. त्यामधून लॅंडस्केप निसर्गचित्र या विभागातून आशिष इरप यांच्या कलाकृतीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबई सीएसटी परिसरातील प्रवासी वातावरणाचे दृश्य साकारले आहे, त्यामध्ये अत्यंत सुंदर अशी प्रकाश योजना, मनमोहक रंगसंगती यामुळे चित्र अतिशय सुंदर झाले आहे.
 हे चित्र पाहताना आशिष यांचे वॉटरकलर या माध्यमावर असलेले त्यांचे प्रभुत्व सहजपणे दिसून येते. इरप यांच्या अनेक कलाकृतींना यापूर्वी अनेकदा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही