मुंब्रा कौसा मध्ये रंगणार एमपीएल क्रिकेट स्पर्धा,विजेत्या संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये तर उप विजेत्या संघाला मिळणार २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे बक्षिस

मुंब्रा कौसा मध्ये रंगणार एमपीएल क्रिकेट स्पर्धा,
विजेत्या संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये तर उप विजेत्या संघाला मिळणार २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे बक्षिस 
मुंब्रा -  मुंब्रा कौसा येथील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना संधी मिळण्यासाठी व क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी मुंब्रा कौसा येथे मुंब्रा प्रीमीयम लिग (एमपीएल)) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ८ डिसेंबर ते १० डिसेंबर दरम्यान मौलाना अबुल कलाम आझाद स्टेडियममध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. विजेत्या संघाला ३ लाख ३३ हजार ३३३ रुपये तर उप विजेत्या संघाला मिळणार २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे बक्षिस दिले जाईल. त्याशिवाय सामनावीर, मालिकावीर व इतर वैयक्तिक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. 
या स्पर्धेचे आयोजक मुंब्रा कौसा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद अली अश्रफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी शमीम खान, शब्बीर खान, आझिम शेख, एहतशाम खान, जावेद शेख, सादिक खान, इम्तियाज वणू व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 
या स्पर्धा आयोजित करण्यामागे मुंब्रा कौसा मध्ये खेळाला  प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. स्पर्धेचे यंदाचे 11 वे वर्ष आहे. 
या स्पर्धेत १६ संघ सहभागी होणार आहेत. त्यामधील खेळाडूंचा लिलाव या अगोदरच झाला असून खेळाडुंची किमान किंमत २ हजार रुपये ठरवण्यात आली होती. त्यामध्ये ३३ हजार रुपयांना एका खेळाडूला सर्वाधिक बोली लावण्यात आली. 
या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक संघात २ खेळाडू ४० वर्षांपेक्षा जास्त वयाचे खेळवले जाणार आहेत, त्यामुळे प्रत्येक संघात १३ खेळाडू असतील.  उदयोन्मुख व अनुभवी खेळाडूंना लाभ होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.  यापूर्वी झालेल्या स्पर्धांमध्ये आपली छाप सोडणाऱ्या काही खेळाडूंची राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही