ई केवायसी न झाल्यास रेशन कार्ड बंद होणार नाही, रेशनिंग अधिकाऱ्यांची मुस्लिम लीगच्या शिष्टमंडळाला ग्वाही, ई केवायसी पूर्ण करण्यासाठी रविवारी देखील शिधावाटप दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना

 ई केवायसी न झाल्यास रेशन कार्ड बंद होणार नाही, रेशनिंग अधिकाऱ्यांची मुस्लिम लीगच्या शिष्टमंडळाला ग्वाही,

ई केवायसी पूर्ण करण्यासाठी रविवारी देखील शिधावाटप दुकाने सुरु ठेवण्याच्या सूचना
मुंब्रा - शिधापत्रिकेसाठी ई केवायसी न केल्यास शिधापत्रिका रद्द होणार नाही, मात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांच्या शिधावाटप दुकानात जावून केवायसी प्रक्रिया करुन घ्यावी असे आवाहन मुंब्रा येथील फ ४८ चे शिधावाटप अधिकारी रोहित माळकर यांनी केले. केवायसी न केल्यास शिधापत्रिका रद्द होईल असा गैरसमज नागरिकांमध्ये पसरल्याने त्याबाबत मुस्लीम लीगच्या शिष्टमंडळाने शिधावाटप अधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी केवायसी न झाल्यास रेशन कार्ड बंद होणार नाही अशी ग्वाही मुस्लिम लीगच्या शिष्टमंडळाला दिली. नागरिकांना कोणतेही हमीपत्र भरुन देण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 मुंब्रा कौसा परिसरातील काही शिधावाटप दुकानांमध्ये नागरिकांना कमी प्रमाणात धान्य मिळत असल्याच्या तक्रारी मुस्लीम लीगच्या विद्यार्थी विभागाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा फरहत शेख यांनी माळकर यांच्यासमोर मांडल्या त्यावर त्यांनी याबाबत तपासणी करुन तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती शेख यांनी दिली. शेख यांच्या शिष्टमंडळात ठाणे जिल्हाध्यक्ष अमीन शेख, मुंब्रा अध्यक्ष जहागीर शेख, अमीर शेख यांचा समावेश होता.
 
मुंब्रा कौसा परिसरातील शिधावाटप लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठी शिधावाटप दुकानदारांनी शनिवारी व रविवारी दुकाने सुरु ठेवून ही प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांना सहकार्य करावे, अशा सूचना माळकर यांनी दुकानदारांना दिल्या आहेत.  लाभार्थ्यांनी शिधावाटप दुकानात जावून आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन शिधावाटप अधिकारी रोहित माळकर यांनी केले आहे. फेब्रुवारी च्या अखेरपर्यंत सर्व लाभार्थ्यांची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही