सामूहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडप्यांचे लग्न, विधवा व घटस्फोटितांचा देखील समावेश

सामूहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडप्यांचे लग्न,  

विधवा व घटस्फोटितांचा देखील समावेश 

मुंब्रा -  मुंब्रा मध्ये झालेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात ३२ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले. यामध्ये तीन जणी विधवा तर पाच जणी घटस्फोटित होते. यस वी कॅन व सागर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक विवाह सोहळ्याचे हे चौथे वर्ष होते. 

नवपरिणीत जोडप्याला आयोजकांतर्फे पलंग, कपडे, सोन्याची अंगठी, भांडी व इतर गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या गेल्या. मुफ्ती साजीदुर रहमान यांनी या सोहळ्यात निकाह लावले. हा सामूहिक विवाह सोहळा सर्वांसाठी खुला असल्याची माहिती देण्यात आली. 

 यस वी कॅनचे अध्यक्ष डॉ रमीझ राजा, अँड कबीर चौधरी, सागर चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख गयासुद्दीन खान, जमाल खान यांच्यासहित अनेकांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हातभार लावला. 

------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे एक महिन्यात पॉश ऑडिट, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे निर्देश

दिग्गजांना डावलून शिवसेनेकडून राज्यसभेसाठी नवीन चेहऱ्याला मिळाली संधी

राज्यसभेसाठी भाजपचे धक्का तंत्र, चर्चेत नसलेल्या नावांवर शिक्कामोर्तब