मुंब्रा कब्रस्तानची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, निधी कमी पडू देणार नाही - नजीब मुल्लांची ग्वाही

मुंब्रा कब्रस्तानची प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील, निधी कमी पडू देणार नाही -  नजीब मुल्लांची ग्वाही
मुंब्रा : मुंब्रा येथील कब्रस्तानची सर्व प्रलंबित कामे युध्दपातळीवर व दर्जेदारपणे पूर्ण केली जातील,  त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा ठाणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी दिली.  
मुल्ला यांनी कब्रस्तानला भेट देऊन पाहणी केली. 
यावेळी त्यांच्यासोबत अजीज शेख (बाटा),  राजू अन्सारी उपस्थित होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करुन घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

कब्रस्तानमध्ये माती टाकण्याबाबत यापूर्वी अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. पूर्वी तीन फूट भराव टाकण्यात आला होता, त्यामुळे कामात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. नागरिकांकडून तक्रारी येत होत्या.  मात्र यापुढील कामात आपण स्वत: लक्ष घालत असून आता साडेसहा फूट माती भरणा केली जाईल,  त्यामुळे तक्रारीला कोणतीही जागा राहणार नाही. महापालिका आयुक्तांसोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला असून येत्या काही दिवसांत याबाबतचे कंत्राट दिले जाईल. सध्या मोकळ्या जागेपैकी तीन मीटर जागा मृतदेह दफन करण्यासाठी वापरली जाईल त्यामुळे कब्रस्तानमधील अधिक जागा वापरली जाईल,  अशी माहिती मुल्ला यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही