8 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे बोरिवलीत उत्तर भारतीय संमेलन

8 जानेवारी रोजी रिपब्लिकन पक्षाचे बोरिवलीत उत्तर भारतीय संमेलन
लोकमानस प्रतिनिधी 
मुंबई  दि. 31 - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) उत्तर भारतीय आघाडी च्या वतीने नविन वर्षात येत्या 8 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता बोरिवली पश्चिम गोराई येथील गणेश मंदिरा जवळच्या गोराईचा राजा मैदान येथे उत्तर भारतीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनावणे,उत्तर भारतीय आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष श्यामधर दुबे, उत्तर भारतीय आघाडीचे मुंबई अध्यक्ष हरिहर यादव, उत्तर भारतीय आघाडी चे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस रमेश गौड यांनी दिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत रिपाइंच्या नेत्यांनी ही माहिती दिली. 
     रिपब्लिकन पक्षाने नेहमी उत्तर भारतीयांना साथ दिली आहे. मुंबईतील उत्तर भरतीयांच्या झोपड्या घरांच्या पात्रतेसाठी; फेरीवाले ; टॅक्सीवाले; कष्टकरी  कामगार म्हणून मुंबईत रोजीरोटी साठी कष्ट करणाऱ्या उत्तर भारतीयांना नेहमी त्यांच्या अडीअडचणीत रिपब्लिकन पक्षाने साथ दिली आहे.त्यामुळे मुंबईतील उत्तर भारतीयांचा  रिपब्लिकन नेते रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षावर प्रचंड विश्वास आहे. रिपब्लिकन पक्षाशी   असलेल्या विश्वासाच्या नात्यामुळे उत्तर भारतीयांना रिपब्लिकन पक्षाच्या संघटनेत सामावून घेणार आहोत तसेच आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षातर्फे उत्तर भारतीयांना उमेदवारी देखील देण्याचे धोरण पक्षाध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी निश्चित केल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केली आहे.  
                          महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा परप्रांतीयच्या मुद्दयावर उत्तर भारतीयांशी भेदभाव आणि अन्यायाचा,दहशतीचा,संकटांचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाने नेहमी पुढे येवून उत्तर भारतीयांना जाहिर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर मुंबईतील उत्तर भारतीयांचा प्रचंड विश्वास आहे.त्यामुळे शेकडो उत्तर भारतीय नागरिक येत्या 8 जानेवारी रोजी उत्तर भारतीय संमेलनात उपस्थित राहुन रिपब्लिकन पक्षात प्रवेश करणार आहेत अशी माहिती रिपाइचे उत्तर भारतीय आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष श्यामधर दुबे आणि  मुंबई अध्यक्ष हरिहर यादव ; उत्तर भारतीय आघाडी चे राज्य सरचिटणीस  रमेश गौड यांनी दिली आहे. 
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षात उत्तर भारतीयांना जोडण्यासाठी  रिपब्लिकन पक्षात उत्तर भारतीय आघाडीची स्थापना होऊन उत्तर भारतीय आघाडी चांगले काम करीत असल्याचे प्रतिपादन रिपाइंचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी केल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी दिली. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉ. असदुल्ला खान इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे दोन दिवसीय खाद्य महोत्सव फूड डायनेस्टी संपन्न

डॉ. असदुल्ला खान शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात शैक्षणिक मार्गदर्शन

मोंड हायस्कूलच्या रंगमंचाचे अनावरण, गावच्या विकासासाठी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणार, शरद कुळकर्णींची ग्वाही